
political analysis trump popularity hits record low 61 percent americans oppose iran war 2026
Donald Trump Popularity Decline 2026 : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ आणि महागाई कमी करण्याच्या आश्वासनावर सत्ता मिळवली खरी, पण इराणसोबत सुरू झालेला लष्करी संघर्ष आता त्यांच्याच राजकीय कारकिर्दीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका खळबळजनक सर्वेक्षणानुसार, अमेरिकन जनतेमध्ये ट्रम्प यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत असून ती आतापर्यंतच्या सर्वात कमी ३६ टक्क्यांवर आली आहे. इराणवरील हल्ल्याने केवळ मध्य-पूर्व हादरले नाही, तर व्हाईट हाऊसचा पायाही डळमळीत केला आहे.
काही आठवड्यांपूर्वी ४७ टक्क्यांवरून सुरू झालेला ट्रम्प यांचा प्रवास आता ३६ टक्क्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. गेल्या अवघ्या सात दिवसांत त्यांच्या रेटिंगमध्ये ४ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. सर्वेक्षणातील ६२ टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र असमाधान व्यक्त केले आहे. दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा झटका ट्रम्प यांच्यासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ट्रम्प ज्या तेहरानवर हल्ल्याची भाषा करत आहेत, त्याच हल्ल्यांना ६१ टक्के अमेरिकन नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. अमेरिकन जनतेला हे युद्ध नको आहे. युद्धामुळे ओढवलेली असुरक्षितता आणि पुन्हा एकदा परकीय भूमीवर अमेरिकन सैन्याचे रक्त सांडले जाण्याची भीती यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ आहेत. केवळ ३५ टक्के कट्टर समर्थक या लष्करी कारवाईच्या बाजूने उभे असल्याचे दिसून येत आहे.
#MediaFocus #US President #DonaldTrump‘s approval rating has dropped in recent days to its lowest level since the start of his second term, driven by surging fuel prices and widespread disapproval of the war he launched against #Iran, according to a Reuters/Ipsos poll released… pic.twitter.com/WJiTh5p24R — China Daily (@ChinaDaily) March 25, 2026
credit – social media and Twitter
ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत झालेल्या घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे ‘महागाई’. इराण युद्धाने जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढवल्या, ज्याचा थेट फटका अमेरिकेतील पेट्रोल पंपांवर बसला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे मध्यमवर्गीय अमेरिकन कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या अगदी उलट परिस्थिती निर्माण झाली असून, आर्थिक व्यवस्थापनावर केवळ २९ टक्के लोकांनीच त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. ही परिस्थिती माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळापेक्षाही बिकट मानली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Myanmar Crisis : ‘मरण्यासाठी 1 लाख सैनिक तयार!’ म्यानमारच्या हुकूमशहाची क्रूर योजना; रशियाने पुरवला शस्त्रांचा डोंगर
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर हे युद्ध लांबले, तर ट्रम्प यांच्यासाठी पुन्हा सावरणे कठीण होईल. अमेरिकन जनता सध्या अन्न, वस्त्र आणि इंधनाच्या वाढत्या किमतींनी त्रस्त आहे. राहणीमानाचा दर्जा खालावल्यामुळे केवळ २५ टक्के लोक ट्रम्प यांच्या धोरणांचे समर्थन करत आहेत. जर ट्रम्प यांनी तात्काळ युद्ध थांबवण्याचे किंवा महागाई कमी करण्याचे प्रयत्न केले नाहीत, तर त्यांची राजकीय पकड सैल होऊ शकते.
Ans: ताज्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांची लोकप्रियता ३६ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात कमी आहे.
Ans: सुमारे ६१ टक्के अमेरिकन नागरिक तेहरानवर होणाऱ्या लष्करी हल्ल्यांच्या विरोधात आहेत.
Ans: इराण युद्धामुळे वाढलेली महागाई, तेलाच्या किमतीतील वाढ आणि आर्थिक धोरणांवरील जनतेचा उडालेला विश्वास ही प्रमुख कारणे आहेत.