Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lebanon War: हिजबुल्लाहच्या अस्तित्वावरच गदा? लेबनॉनचा 10% भूभाग गिळंकृत करणार, इस्रायली संरक्षण मंत्र्यांचा आश्चर्यकारक दावा

US Israel Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अनेक देशांमध्ये पसरले असून, लेबनॉनला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इस्रायलने लेबनॉनच्या १० टक्के भूभागावर कब्जा करण्याचा दावा केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 25, 2026 | 12:30 PM
israel to occupy 10 percent lebanon litani river buffer zone katz claim 2026

israel to occupy 10 percent lebanon litani river buffer zone katz claim 2026

Follow Us
Follow Us:
  • भूभागावर कब्जा
  • नो-मॅन्स लँड
  • अस्तित्वाची लढाई

Israel occupation of South Lebanon 2026 : मध्य-पूर्वेतील युद्धाने (us-israel iran war) आता सर्वात भीषण वळण घेतले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता लेबनॉनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे, ज्याने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. इस्रायल आता दक्षिण लेबनॉनच्या १० टक्के भूभागावर कायमस्वरूपी ताबा मिळवण्याच्या तयारीत आहे.

लिटानी नदीपर्यंत इस्रायलचा ‘बफर झोन’

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांच्या दाव्यानुसार, इस्रायली सैन्य (IDF) दक्षिण लेबनॉनमधील लिटानी नदीपर्यंतचा संपूर्ण भाग आपल्या नियंत्रणात घेणार आहे. ही नदी इस्रायली सीमेपासून सुमारे ३० किलोमीटर आत आहे. हा भाग लेबनॉनच्या एकूण क्षेत्राच्या अंदाजे १० टक्के आहे. इस्रायलचा उद्देश येथे एक अभेद्य ‘संरक्षण बफर झोन’ तयार करणे हा आहे. काट्झ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत इस्रायलच्या उत्तर भागातील सुरक्षा सुनिश्चित होत नाही, तोपर्यंत सैन्य या भूभागातून मागे हटणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Ceasefire: ट्रम्पची खोड जिरवणार इराण! जेडी व्हान्स पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच उभा केला ‘अशा’ अशक्य अटींचा डोंगर

‘इथे घरं उरणार नाहीत, ना माणसं…’

संरक्षण मंत्र्यांचे सर्वात धक्कादायक विधान म्हणजे, या बफर झोनमध्ये आता कोणतेही घर किंवा नागरी वस्ती उरणार नाही. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी हा भाग पूर्णपणे रिकामा केला जाणार आहे. यामुळे दक्षिण लेबनॉनमधील लाखो लोकांनी आधीच उत्तरेकडे पलायन केले आहे. इस्रायलने लिटानी नदीवरील अनेक महत्त्वाचे पूल आधीच उद्ध्वस्त केले आहेत, जेणेकरून हिजबुल्लाहचे लढवय्ये आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक रोखता येईल. याला इस्रायलने “अग्ररक्षक संरक्षण रेषा” (Forward Defense Line) असे नाव दिले आहे.

🇮🇱🇱🇧 Israeli Defense Minister Israel Katz has promised Israel will take control of South Lebanon all the way to the Litani River. Katz added that displaced residents of South Lebanon residents “will not return south of the Litani River until security is guaranteed for the… pic.twitter.com/Y9lJLGcQCg — Europa.com (@europa) March 24, 2026

credit – social media and Twitter

हिजबुल्लाहचा प्रत्युत्तर आणि इराणचा ड्रोन अटॅक

इस्रायलच्या या घोषणेनंतर हिजबुल्लाहने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी या योजनेला लेबनॉनच्या अस्तित्वासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. प्रत्युत्तरादाखल हिजबुल्लाहने इस्रायलच्या हैफा आणि नाहारिया शहरांवर ३० हून अधिक रॉकेट डागले आहेत. दुसरीकडे, इराणनेही इस्रायलवर आपले ड्रोन हल्ले सुरूच ठेवले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, बहरीनमधील एका अमेरिकन तळावर मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे या युद्धात आता अमेरिका अधिक सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Myanmar Crisis : ‘मरण्यासाठी 1 लाख सैनिक तयार!’ म्यानमारच्या हुकूमशहाची क्रूर योजना; रशियाने पुरवला शस्त्रांचा डोंगर

वाटाघाटींची शक्यता धूसर

एकूणच परिस्थिती पाहता, अमेरिका आणि इराणमधील वाटाघाटी आता फिस्कटल्याचे दिसत आहे. इराण आपल्या कठोर मागण्यांवर ठाम आहे, तर इस्रायलने लेबनॉनमध्ये आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. जर इस्रायलने खरोखरच लिटानी नदीपर्यंतचा भाग ताब्यात घेतला, तर मध्य-पूर्वेचा नकाशा कायमचा बदलू शकतो आणि हे युद्ध एका मोठ्या जागतिक संकटात रूपांतरित होऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायल लेबनॉनच्या किती भूभागावर कब्जा करणार आहे?

    Ans: इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांच्या मते, इस्रायल दक्षिण लेबनॉनच्या लिटानी नदीपर्यंतच्या सुमारे १० टक्के भूभागावर ताबा मिळवणार आहे.

  • Que: 'लिटानी नदी' (Litani River) इस्रायलसाठी का महत्त्वाची आहे?

    Ans: लिटानी नदी सीमेपासून ३० किमी आत आहे. हा भाग ताब्यात घेतल्यास हिजबुल्लाहला इस्रायलवर थेट रॉकेट हल्ले करणे कठीण होईल.

  • Que: या निर्णयाचा लेबनॉनमधील नागरिकांवर काय परिणाम होईल?

    Ans: या भागाला 'बफर झोन' घोषित केल्यामुळे तेथील नागरी वस्त्या नष्ट केल्या जातील, ज्यामुळे लाखो लोक कायमचे विस्थापित होतील.

Web Title: Israel to occupy 10 percent lebanon litani river buffer zone katz claim 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Lebanon-Israel
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी
1

Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी

US-Iran War : इराणसोबत युद्धविरामाच्या सातत्याने चर्चा सुरु; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2

US-Iran War : इराणसोबत युद्धविरामाच्या सातत्याने चर्चा सुरु; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

US-Israel War: इराण युद्धसज्ज! ढिगाऱ्याखालून बाहेर काढला 1000 क्षेपणास्त्रांचा महाकाय खजिना; एक बुलडोझर अन् महासत्तेला धक्का
3

US-Israel War: इराण युद्धसज्ज! ढिगाऱ्याखालून बाहेर काढला 1000 क्षेपणास्त्रांचा महाकाय खजिना; एक बुलडोझर अन् महासत्तेला धक्का

War Update: कुवेत बनले रणांगण! अमेरिकेचा इराणच्या 2 बेटांवर भीषण बॉम्बहल्ला; रडार यंत्रणा उद्ध्वस्त, पाच सैनिक जखमी, तणाव शिगेला
4

War Update: कुवेत बनले रणांगण! अमेरिकेचा इराणच्या 2 बेटांवर भीषण बॉम्बहल्ला; रडार यंत्रणा उद्ध्वस्त, पाच सैनिक जखमी, तणाव शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.