Pope Francis Health Update Pope Francis got discharged from the hospital
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना रविवारी (23 मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या पाच आठवड्यांहून अधिका काळ ते रुग्णालयात गंभीर अवस्थेत होते. दरम्यान त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी प्रथमच लोकांना सावर्जनिक दर्शन दिले. रोममधील जेमेली रुग्णालयातून त्यांनी लोकांचे अभिवादन केले. फ्रान्सिस यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया झाला होता. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांनी भेटायला आलेल्या लोकांना “धन्यवाद” म्हटले. लोकांनी केलेल्या प्रार्थनांचे त्यांनी आभार मानले. पोप यांना बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती.
दरम्यान त्यांनी व्हॅटिकनकडे परत जाताना रोमच्या मध्यवर्ती भागातील पॅपल बॅसिलिकामध्ये प्रार्थना केली. त्यानंतर त्यांना व्हॅटिकनमध्ये नेण्यात आले. त्यांनी लोकांसाठी व्हॅटिकनद्वारे एक संदेश जारी केला. या संदेशात त्यांनी, त्यांच्या आजाराच्या काळात, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि इतर कुटूंबीयांच्या सेवाभावाचे कौतुक केले. त्यांनी जगभरातीसल संघर्षावर भाष्य करत आर्मेनिया आणि अजरबैजानमधील शांतता कराराचे स्वागत केले. तसेच त्यांनी गाझापट्टीतल इस्त्रायली बॉम्ब हल्ल्यांबद्दल दु:ख व्यक्त केले. रुग्णालयात दाखल असताना पोप यांनी युद्धग्रस्त गाझातील कॅथोलिक चर्चशी रोज रात्री फोनवरुन संपर्क साधला.
पाच आठवड्यांहून अधिक काळ पोप फ्रान्सिस रुग्णालयात दाखल होते. गेल्या दोन आठड्यांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. दरम्यान रविवारी 23 मार्च रोजी त्यांना रुग्णलयातून बरी करण्यात आले आहे. मात्र, डाक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांना अजून दोन महिने आरामाची गरज आहेय त्यांचे शरीर पूर्णपण बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल. सध्या त्यांच्या प्रकृतीत वारंवार चढ-उतार होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.