Pope Fransis Health Update: पोप फ्रान्सिस यांची प्रकृती पुन्हा बिघडली; दम्याच्या झटक्यानंतर... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती दम्याच्या अटॅकनंतर पुन्हा गंभीर झाली आहे. यामुळे त्यांना उच्च प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला. वेटिकन प्रेस ऑफिसनुसार, त्यांना रक्तही चढवण्यात आले. डॉक्टरांनी 21 फेब्रुवारी रोजी त्यांना धोक्याबाहेर असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर त्यांच्या वेदना वाढल्या.
पोप फ्रान्सिस यांची स्थिती
पंतप्रधान मेलोनी यांची भेट
19 फेब्रुवारी रोजी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, पोप यांच्या चेहऱ्यावर हास्य होते आणि त्यांनी त्यांच्याशी विनोदही केले.
अंत्यसंस्काराची अफवा
काही दिवासांपूर्वी माध्यमांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असल्याचा दावा केला होता. मात्र, व्हेटिकन आणि स्विस गार्डच्या प्रवक्त्यांनी याला अफवा ठरवत परिस्थीती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले होते.
पोप फ्रान्सिस यांचे कार्यक्रम रद्द
पोप फ्रान्सिस यांना 205 च्या कॅथोलि पवित्र वर्षासाठी अनेक कार्यक्रमांचे नेतृत्व करायचे होते, मात्र, सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याने काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. व्हॅटिकन पुढील अपडेट लकवरच कळवण्यात येतील असे म्हटले आहे.
कोण आहेत पोप?
पोप फ्रान्सिस हे 1000 वर्षांतील पहिले गैर-यूरोपीय पोप आहेत. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेंटिनातील फ्लोरेस येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव जॉर्ज मारियो बर्गोग्लियो आहे. 2013 मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या निवृत्तीनंतर ते रोमन कॅथोलिक चर्चचे 266 वे पोप झाले.
त्यांनी दर्शनशास्त्र आणि धर्मशास्त्रात मास्टर डिग्री घेतली असून, 1998 मध्ये ब्यूनस आयर्सचे आर्चबिशप झाले. 2001 मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांना कार्डिनल पद दिले. ते जेसुइट्स संघटनेचे सदस्य असलेले आणि दक्षिण अमेरिकेतून पोप पदावर पोहोचलेले पहिले धर्मगुरु आहेत.