Pope Francis Journey to the Papacy From Chemical Technician and Teacher to Beloved Catholic Leader
कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88 वर्षी सोमवारी (21 एप्रिल) निधन झाले, अशी माहिती व्हॅटिकनने दिली. फ्रान्सिस यांनी दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते. यामुळे त्यांना फ्रेब्रुवारी मध्ये रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे जगभरातील कॅथलिक लोक दु:त असून त्यांनी शोख व्यक्त केला आहे. दरम्यान डबल निमोनियाशी झुंज देत असलेल्या पोप फ्रान्सिस यांचा जीवनप्रवास अगदी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. आजा आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
पोप फ्रान्सिस यांनी 2013 मध्ये पोप म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी या 12 वर्षाच्या काळात अनेक आजारांता सामान केला. पोपो फ्रान्सिस हे त्यांच्या विनम्रतेसाठी, सामाजिक समर्पणासाठी आणि त्यांच्या साधेपणासाठी जगभर ओळखले जातात. पोप फ्रान्सिस यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 मध्ये अर्जेंटिनाच्या ब्यूनस आयर्स येथे झाला होता. त्यांचे मूळ नमाव जॉर्ज मारियो बर्गोग्लियो होते.
पोप फ्रान्सिस यांनी आपल्या 12 वर्षाच्या कार्यकाळात गरिबांच्या हक्कांसाठी, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यासाठी आवाज उठवला. तसेच त्यांनी महिलांना गर्भपात माफ करण्याचा अधिकार दिला. चर्च धोरणांमध्ये पारदर्शकतेसाठी कार्डिनल्स सल्लागार पदाची स्थापना पोप फ्रान्सिस यांनी केली होती. परंतु त्यांनी काही परंपरागत रुढी, महिला पाद्रींवर असलेली बंदी कायम ठेवली.
पोप यांनी प्राभवशाली धर्मगुरु म्हणून ओळखले जात होते. त्यांची जीवनशैली अतिशय साधी होती. पोप निवासस्थानात न राहता साध्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. तसेच स्वत:चे जेवण स्वत:च बनवत होते. पोप नेहमी म्हणायचे “माझे लोक गरीब आहेत, आणि मीही त्यांच्यापैकीच एक आहे. त्यांनी जगाला मानवतेचा, आणि साधेपणाचा संदेश दिला आहे.