Pope Fransis Health Update Pope’s condition showing slight improvement
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. पोप यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया आणि श्वसनमार्गाच्या संसर्ग झाला होता. गेल्या एका आठवड्यापासून त्यांना रोमच्या गेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी म्हणण्यानुसार, पोप अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत, पण त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि आता कोणताही मोठा धोका नाही.
पोप यांच्या प्रकृती संदर्भात अफवा
गेल्या काही दिवसांत पोप यांच्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरवल्या होत्या. काही माध्यमांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असल्याचा दावा केला होता. मात्र, व्हेटिकन आणि स्विस गार्डच्या प्रवक्त्यांनी याला अफवा ठरवत परिस्थीती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाला व्हेटिकन?
व्हेटिकनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोप रुग्णालयातून चर्चच्या कामकाजावर लक्ष ठेवत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना पॉलीमायक्रोबियल इन्फेक्शन असल्यामुळे उपचार पद्धतीत बदल करावा लागला. जरी दोन्ही फुफ्फुसांमध्ये संसर्ग असला तरी पोप चांगल्या स्थितीत आहेत आणि ते त्यांच्या बेडवरून उठून थोडा वेळ खुर्चीत बसू शकतात.
पोप फ्रान्सिसचे मनोबल अगदी बळकट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी दिवसभर वाचन, विश्रांती आणि प्रार्थना केली असल्याचे व्हॅटिकन सांगितले. तसेच त्यांनी शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले व त्यांच्या प्रार्थना मागितल्या. गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी, पोप फ्रान्सिस यांना काही दिवसांपासून ब्रॉन्कायटीसची लक्षणे जाणवत होती. यामुळे त्यांनी आपले भाषण अधिकाऱ्यांमार्फत देण्याचे ठरवले.
जॉर्जिया मेलोनी यांची पोप यांना भेट
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकतीच पोप यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, पोप यांची प्रकृती सुधारत असून त्यांचा चेहरा हसरा आहे. मेलोनी म्हणाल्या की, “आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारल्या. पोप यांचा विनोदबुद्धीचा स्वभाव अजूनही तसाच आहे.”
कोण आहेत पोप?
पोप फ्रान्सिस हे 1000 वर्षांतील पहिले गैर-यूरोपीय पोप आहेत. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेंटिनातील फ्लोरेस येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव जॉर्ज मारियो बर्गोग्लियो आहे. 2013 मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या निवृत्तीनंतर ते रोमन कॅथोलिक चर्चचे 266 वे पोप झाले.
त्यांनी दर्शनशास्त्र आणि धर्मशास्त्रात मास्टर डिग्री घेतली असून, 1998 मध्ये ब्यूनस आयर्सचे आर्चबिशप झाले. 2001 मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांना कार्डिनल पद दिले. ते जेसुइट्स संघटनेचे सदस्य असलेले आणि दक्षिण अमेरिकेतून पोप पदावर पोहोचलेले पहिले धर्मगुरु आहेत.