
इंडोनेशियात शक्तिशाली भूकंप; रिश्टर स्केलवर 5.2 नोंदवली गेली भूकंपाची तीव्रता
जकार्ता : गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवत आहे. हिंगोलीमध्ये भूकंप झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता इंडोनेशियामध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, भूकंपाची तीव्रता 5.2 होती. हा भूकंप रविवारी पहाटे 5.07 वाजता झाला. जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर या धक्क्यांची नोंद झाली.
इंडोनेशियामध्ये रिश्टर स्केलवर 5.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले. रविवारी सकाळी इंडोनेशिया भूकंपाने हादरले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के सकाळी ५:०७ वाजता जाणवले. भूकंपाची खोली जमिनीखाली १० किलोमीटर होती. सकाळी भूकंप झाला तेव्हा बहुतेक लोक घरातच होते. तीव्र धक्क्यांमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आणि ते घराबाहेर धावले, ज्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. इंडोनेशिया हा भूकंपप्रवण प्रदेश मानला जातो.
Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; शहरांमध्ये हादरे, नागरिकांची धावपळ
भूकंपाचा परिणाम समजून घेण्यासाठी त्याची तीव्रता आणि खोली महत्त्वपूर्ण असते. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण अद्याप कळलेले नाही. त्याचप्रमाणे, कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध नाही.
पेरूमध्ये मोठा भूकंप
काही दिवसांपूर्वी, पेरू या देशामध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. दक्षिण पेरूभर तीव्र धक्के जाणवले. पेरूच्या दक्षिण अँडीज पर्वतरांगेत ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. इका आणि अरेक्विपासह अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. आतापर्यंत कोणतीही मोठी वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू आयाकुचो प्रदेशातील पारिनाकोचास प्रांतातील उपाहुआचोच्या वायव्येस सुमारे ३८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंप जमिनीखाली अंदाजे ६६.७ किलोमीटर खोलवर झाला. खोली जास्त असल्यामुळे भूकंपाचे धक्के दूरवर जाणवले.
Japan Earthquake : जपानमध्ये मोठा भूकंप; ईशान्य किनाऱ्याजवळ जाणवले धक्के, 6.1 नोंदवली गेली तीव्रता