President Donald Trump fires air force general CQ Brown as chairman of joint chiefs of staff
वॉशिंग्टन: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिकन लष्कराच्या टॉप मिलिट्री जनरलची हाकलपट्टी केली आहे. शुक्रवारी (21 फेब्रुवारी) ट्रम्प यांनी जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे चेअरमन जनरल चार्ल्स ब्राउन ज्युनियर यांनी सेवेतून काढून टाकले आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासन बदलल्यानंतर एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला अशा प्रकारे हटविण्यात आले आहे.
या व्यक्तीची केली नियुक्ती
ट्रम्प यांनी जनरल सी. क्यू. ब्राउन यांना हटवून त्यांच्या जागी अमेरिकन हवाई दलाचे निवृत्त लेफ्टिनेंट जनरल डॅन कॅन लैंगे यांची नियुक्ती केली आहे. लेफ्टिनेंट डॅन कॅन हे F-16 फायटर जेटचे माजी पायलट राहिले आहेत आणि गेल्या वर्षापर्यंत सीआयएमध्ये मिलिटरी अफेयर्सच्या असोसिएट डायरेक्टर पदावर कार्यरत होते.
ट्रम्प यांनी का उचलले हे पाऊल?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सी. क्यू. ब्राउन यांच्या बडतर्फीची घोषण त्यांच्या ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर केली. त्यांनी या पोस्टमध्ये संकेत दिले की, भविष्यात सैन्यात मोठे बदल होऊ शकतात. अमेरिकेच्या इतिहासात सहसा प्रशासन बदलल्यानंतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या भूमिकेत मोठे फेरबदल होत नाहीत. मात्र, ट्रम्प यांनी ही परंपरा मोडीत काढली आहे. जनरल चार्ल्स क्यू. ब्राउन ज्युनियर हे ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफचे चेअरमन होणारे दुसरे आफ्रिकन-अमेरिकन अधिकारी होते.
ट्रम्प यांची सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई
डोनाल्ड ट्रम्प सध्या विविध सरकारी अधिकाऱ्यांना हटवण्याच्या मोहिमेत आहेत. विशेषतः डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन (DEI) उपक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या पदांवरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळाच्या सुरुवातीलाच त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. अनेक अधिकाऱ्यांना आधीच हटविण्यात आले आहे, आणि आणखी बडतर्फी होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर पोस्ट
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, सी. क्यू. ब्राउन यांचे आभार मानतो, तसेच ट्रम्प यांनी त्यांना एत चांगला आणि सज्जन व्यक्ती म्हणून संबोधले. मा, त्यांच्या या निर्णयावर अमेरिकेत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक या निर्णयाचे स्वागत करत आहेत, तर काहींनी या कृतीवर आक्षेप घेतला आहे. येत्या काळात ट्रम्प यांच्या या निर्णयाचा अमेरिकी सैन्यावर आणि प्रशासनावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.