
Operation Mongoose
ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ
दरम्यान ट्रम्प यांनी आता क्युबा टार्गेट केलं आहे. त्यांनी क्युबाला धमकी दिली आहे की, अमेरिकेसोबत त्यांनी करार करावा. अन्यथा त्यांना व्हेनेझुएलाकडून तेल किंवा पैसा मिळणार नाही. त्यांच्या या धमकीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, क्युबाला आता तेल किंवा पैसा पाठवला जाणार नाही. त्यांना मी आधीच अमेरिकेसबोत करार करण्याचा सल्ला दिला होता.
क्युबा गेल्या अनेक वर्षांपासून व्हेनेझुएलाच्या तेल आणि पैशावर अवलंबून आहे. या बदल्यात क्युबाने व्हेनेझुएलाच्या हुकूमशाहांना सुरक्षा सेवा पुरवली होती. परंतु अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात क्युबाचे अनेक सुरक्षा अधिकारी मारले गेल आहेत. यानंतर ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाकडून मिळणारे आर्थिक पाठबळ बंद करण्याची धमकी दिली आहे. यामुळे व्हेनेझुएलाचे सरकार कोसळले असा युक्तिवाद ट्रम्प यांनी केला आहे. तसेत त्यांनी आणखी एक धक्कादायक विधान केले आहे. ट्रम्प अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना क्युबाचे नेते बनवू इच्छित आहेत. यासाठी ते योग्य व्यक्तीमत्त्व असल्याचे ट्रम्प यांना वाटते.
क्युबाची अर्थव्यवस्थाही व्हेनेझुएलाच्या तेलावर अवलंबून आहे. गेल्या अनेक काळापासून व्हेनेझुएलाकडून क्युबाला तेल आणि पैस मिळतात. परंतु मादुरो यांच्या अटकेनंतर यावर निर्बंध लागले आहे. तसेच ट्रम्प यांनी हे पाठबळ बंद करण्याची धमकी दिली आहे. परंतु यामुळे क्युबावर मोठा आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. उर्जा संकट, आर्थिक अस्थिरता आणि सामाजाकि असंतोषाचे वातावरण क्युबामध्ये पसरण्याची शक्यता असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या या धमक्यांनतर ऑपरेशन मंगूस (Operation Mongoose) च्या आठवणी ताज्या झाल्या आहे. १९६१ ते १९६२ च्या काळाता क्युबामध्ये फिडेल कास्त्रो सरकारला हटवण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले होते. त्याकाळचे अमेरिकेचे अध्यक्ष डॉन एफ. केनेडी यांच्या मंजुरीने CIA ने ही मोहिम राबवली होती. यावेळी क्युबावर दबाव वाढवण्यासाठी अनेक धोकादायक योजना आखण्यात आल्या होत्या.
या मोहिमेचा हेतू क्युबाची अर्थव्यवस्था कमकुवत करणे, जनतेत असंतोष निर्माण करणे आणि कास्त्रो यांना सत्तेवरुन हटवणे हा होता. यासाठी तोडफोड, प्रचारयुद्ध, गुप्त कारवाया आणि कास्त्रोच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. विस्फोट सिगा, विषारी मिल्कशेक, संसर्गजन्य रोगांनी भरलेला डायव्हिंग सूट, स्फोटक शीफ अशा घटना घडवण्यात आल्या होता. मात्र अमेरिकेचा हा प्रयत्न अपयशी ठरला होता. कास्त्रो सत्तेत कायम राहिले. पण यानंतर अमेरिका आणि क्युबामध्ये तणाव निर्माण झाला होता.
व्हेनेझुएलानंतर इराणमध्ये सत्तापालट? डोनाल्ड ट्रम्पकडून तेहरानमध्ये लष्करी कारवाईचे संकेत
Ans: 1961 ते 62 दरम्यान अमेरिकेने क्युबामध्ये कास्रो सरकारला हटवण्यासाठी गुप्त कारवाई केली होती. यामध्ये तोडफोड, युद्ध, हत्यांचा कट रचण्यात आला होता. परंतु अमेरिकेचा हा प्रयत्न अपयशी ठरला होता.
Ans: ट्रम्प यांनी क्युबाला अमेरिकेसोबत करार करण्यास सांगितला आहे अन्यथा व्हेनेझुएलातून मिळणारा तेल पुरवठा बंद केला जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Ans: ट्रम्प यांनी क्युबाला व्हेनेझुएलाचे तेल बंद करण्याची धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत व्हेनेझुएलाच्या तेलावर अवलंबित असल्याने हा तेल पुरवठा बंद झाल्यास क्युबामध्ये उर्जा संकट, आर्थिक अस्थिरता आणि सामाजाकि असंतोष वाढू शकतो. तसेच अमेरिका आणि क्युबामध्ये तणाव निर्माण होण्याची धमकी दिली आहे.