Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Protests: ‘त्यांनी स्वतः फोन केला!’ Donald Trump यांचा एअर फोर्स वनवरून इराणबद्दल मोठा गौप्यस्फोट; खामेनेईंचा ‘असा’ प्रस्ताव

US Iran Meeting : जर सरकारने निदर्शकांविरुद्ध हिंसाचार केला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला लष्करी हल्ले करण्याची धमकी दिली. नंतर इराणने चर्चेचा प्रस्ताव दिला. जाणून घ्या काय आहे परिस्थिती ते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 12, 2026 | 12:48 PM
trump claims iran leaders contacted for negotiations military strike threat 2026

trump claims iran leaders contacted for negotiations military strike threat 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
  • चर्चेपूर्वी हल्ल्याचे संकेत
  • इराणची दुहेरी भूमिका

Trump Iran meeting claim January 2026 : इराणमधील (Iran) अंतर्गत निदर्शने आता जागतिक युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अलिकडेच इराणला लष्करी हल्ल्याची उघड धमकी दिल्यानंतर, आता इराणच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसत आहे. ११ जानेवारी रोजी एअर फोर्स वन (Air Force One) विमानात पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी संपर्क साधला असून लवकरच दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.

“त्यांना आता बोलणी करायची आहेत” : ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्वक सांगितले की, “इराणी नेत्यांनी काल (१० जानेवारी) आम्हाला फोन केला होता. त्यांना आता वाटाघाटी करायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही बैठकीचे नियोजन करत आहोत.” तथापि, ट्रम्प इथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढे एक गंभीर इशाराही दिला. ते म्हणाले, “बैठक ठरली असली तरी, प्रत्यक्ष चर्चेपूर्वी आम्हाला कदाचित काही ‘ॲक्शन’ घ्यावी लागेल.” ट्रम्प यांच्या या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की, बैठकीच्या मेजावर बसण्यापूर्वी अमेरिका इराणवर मोठा लष्करी दबाव निर्माण करू शकते किंवा त्यांच्या मोक्याच्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक करू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात पुन्हा फुत्कारले दहशतवादाचे अजगर; 1000 सुसाईड बॉम्बर तयार, Masood Azharचा ‘ऑडिओ’ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान

व्हेनेझुएलाची धास्ती आणि इराणचे सावध पाऊल

इराणच्या या बचावात्मक पवित्र्यामागे एक मोठे कारण असल्याचे मानले जाते. अलिकडेच अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये हस्तक्षेप करून निकोलस मादुरो यांना सत्तेवरून खाली खेचले आहे. हीच भीती आता इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांना, विशेषतः अयातुल्ला अली खामेनी यांना सतावत आहे. जर इराणने आपल्या निदर्शकांवर बळाचा वापर सुरू ठेवला, तर अमेरिकन सैन्य थेट तेहरानवर हल्ले करू शकते, असा सज्जड दम ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी खामेनी चर्चेचा मार्ग स्वीकारत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘Iran leaders call yesterday to negotiate but we may’ strike anyway — Trump pic.twitter.com/D73PjZd0dW — RT (@RT_com) January 12, 2026

credit : social media and Twitter

इराणच्या अध्यक्षांचा ‘इमोशनल’ कार्ड आणि अमेरिकेवर आरोप

दुसरीकडे, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्हीवरून देशाला संबोधित करताना जनतेला भावनिक साद घातली आहे. त्यांनी कबूल केले की, लोकांच्या ८०% तक्रारी रास्त आहेत, पण आंदोलनाच्या नावाखाली मशिदी आणि दुकाने जाळणारे लोक हे ‘परकीय हस्तक’ आणि ‘दहशतवादी’ आहेत. पेझेश्कियान यांनी थेट अमेरिकेवर निशाणा साधत म्हटले की, “अमेरिका आपल्या अर्थव्यवस्थेचा शस्त्र म्हणून वापर करत आहे आणि देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया, आम्हाला साथ द्या आणि देशाच्या पाठीशी उभे राहा.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PSLVC62: ISROचे देशाच्या सीमा सुरक्षा उपग्रहाचे स्वप्न भंगले; तिसऱ्या टप्प्यातील ‘त्या’ तांत्रिक बिघाडामुळे घात, मिशन अयशस्वी

काय आहेत अमेरिकेचे पुढचे पर्याय?

ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणमधील हिंसाचारावर अमेरिकन लष्कर बारकाईने लक्ष ठेवून आहे. निदर्शकांच्या मृत्यूमुळे परिस्थिती चिघळली असून अमेरिका ‘व्हेरी स्ट्रॉन्ग’ (खूप शक्तिशाली) पर्यायांवर विचार करत आहे. यामध्ये इराणचे इंटरनेट रिस्टोअर करण्यासाठी ‘एलोन मस्क’ यांच्या स्टारलिंकची मदत घेणे किंवा थेट क्षेपणास्त्र हल्ले करणे, अशा पर्यायांचा समावेश असू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणबद्दल कोणता मोठा दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणी नेत्यांनी स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना चर्चा करायची आहे.

  • Que: इराण अमेरिकेच्या धमकीला का घाबरत आहे?

    Ans: अमेरिकेने अलिकडेच व्हेनेझुएलामध्ये केलेली कारवाई आणि ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ल्याची दिलेली धमकी, यामुळे इराणची राजवट धोक्यात आली आहे.

  • Que: इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भूमिका काय आहे?

    Ans: पेझेश्कियान यांनी जनतेच्या तक्रारी रास्त असल्याचे म्हटले आहे, पण आंदोलनांना हिंसक रूप देण्यामागे अमेरिका आणि इस्रायलचा हात असल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Trump claims iran leaders contacted for negotiations military strike threat 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • iran
  • Iran Attack
  • Iran Protest

संबंधित बातम्या

Iran Protests : इराणमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना अटक? अफवांनी पालकांचा जीव टांगणीला; राजदूतांनी समोर येऊन सांगितलं ‘सत्य’
1

Iran Protests : इराणमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना अटक? अफवांनी पालकांचा जीव टांगणीला; राजदूतांनी समोर येऊन सांगितलं ‘सत्य’

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ
2

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ

Trump Musk: अमेरिकेत रक्तरंजित! खामेनेई विरोधी आंदोलकांविरुद्ध सत्तेचा निर्दय चेहरा; ट्रकने चिरडले, भयावह VIDEO VIRAL
3

Trump Musk: अमेरिकेत रक्तरंजित! खामेनेई विरोधी आंदोलकांविरुद्ध सत्तेचा निर्दय चेहरा; ट्रकने चिरडले, भयावह VIDEO VIRAL

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ 
4

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.