भारतीय वंशाचे काश पटेल यांची FBI संचालक पदी नियुक्ती; भगवद्गीतेवर हाथ ठेवून घेतली शपथ(सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: भारतीय वंशाचे काश पटेल यांनी शनिवारी (22 फेब्रुवारी) भगवद्गीतेवर हात ठेवून फेडर ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशम (FBI) च्या संचालक पदाची शपथ घेतली. ते या प्रतिष्ठित एजन्सीचे नेतृत्व करणारे नववे अधिकारी ठरले आहेत. शपथविधी सोहळा वॉशिंग्टन डी.सी. येथील आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंग (EEOB) येथे पार पडला. शपथ घेतल्यानंतर त्यांनी म्हटले की, “मी अमेरिकन स्वप्न जगत आहे. जो कोणी मानतो की अमेरिकन स्वप्न आता संपले आहे, त्याने आजच्या सोहळ्याकडे पाहावे.”
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या यशाची नोंद
काश पटेल यांनी आपल्या यशाचा उल्लेख करताना सांगितले की, “तुम्ही अशा एका भारतीय वंशाच्या व्यक्तीशी बोलत आहात, जी जगातील सर्वात महान राष्ट्राच्या कायदा अंमलबजावणी संस्थेचे नेतृत्व करत आहे. हे इतर कोणत्याही देशात शक्य झाले नसते.” त्यांनी आश्वासन दिले की FBI मध्ये आणि बाहेर दोन्हीकडे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली जाईल.
#WATCH | Washington | Kash Patel takes oath on the Bhagavad Gita, as the 9th Director of the Federal Bureau of Investigation (FBI).
Source: US Network Pool via Reuters pic.twitter.com/c5Jr0ul1Jm
— ANI (@ANI) February 21, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी केले कौतुक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त केला. ट्रम्प यांनी म्हटले की, “मी काश पटेल यांची FBI संचालकपदी निवड करण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे FBI मधील एजंट त्यांचा आदर करतात. ते या पदावर नियुक्त होण्यासाठी सर्वोत्तम उमेदवार आहेत.”
सीनेटमध्ये मंजुरी
काश पटेल यांच्या नियुक्तीसाठी अमेरिन सीनेटमध्ये मतदान घेण्यात आले होते. 51-49 अशा मतांनी त्यांना मंजुरी मिळाली. मीत्र, डेमोक्रॅटिक पक्षातील काही सदस्यांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. विरोधकांनी आरोप केला होता की, काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावाखाली राहून त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध कारवाई करू शकतात.
विरोधकांचा आक्षेप
डेनोक्रॅटिक पक्षाच्या काही सदस्यांनी काश पटेल यांच्या व्यवस्थापन कौशल्यांवर शंका व्यक्त केली. विरोधकांनी त्यांच्या पूर्वीच्या काही विवादित विधानांचा उल्लेख करत त्यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. रिपब्लिकन पक्षाचे सीनेटर चक ग्रासली यांनी मात्र काश पटेल यांचे समर्थन करत सांगितले की, “पटेल FBI ची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करतील आणि ती अमेरिकन जनतेच्या सेवेसाठी अधिक जबाबदार बनवतील.”
काश पटेल यांची FBI संचालकपदी निवड ही भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळात FBI च्या कार्यपद्धतीत कोणते बदल घडतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनला टॅरिफचा फटका? अमेरिकेसोबत तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू