Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ठिणगी! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे चोख प्रत्युत्तर

"इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटन कोणत्याही परिस्थितीत सामील होणार नाही," असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले असून, यामुळे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 06:28 PM
अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ठिणगी (Photo Credit : X)

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ठिणगी (Photo Credit : X)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ठिणगी!
  • ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे चोख प्रत्युत्तर
  • ‘होर्मुज सामुद्रधुनी’ आणि तेलाचे राजकारण
मध्य पूर्वेत (Middle East) सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता जगातील दोन सर्वात जुन्या मित्रराष्ट्रांच्या संबंधांवर उमटू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर (Keir Starmer) यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. “इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटन कोणत्याही परिस्थितीत सामील होणार नाही,” असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले असून, यामुळे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

‘हे आमचे युद्ध नाही’; पंतप्रधान स्टार्मर यांचे चोख प्रत्युत्तर

पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी राष्ट्राला संबोधित करताना आपली भूमिका स्पष्ट केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो (NATO) मित्रराष्ट्रांना युद्धात सहभागी न झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर स्टार्मर म्हणाले, “माझ्यावर कितीही दबाव आणला गेला किंवा बाहेर कितीही गदारोळ असला, तरी मी नेहमी ब्रिटनच्या हिताचेच निर्णय घेईन. हे आमचे युद्ध नाही आणि आम्हाला यात ओढले जाऊ नये, हे मी स्पष्ट करू इच्छितो.“

🚨 UK PM Keir Starmer on the Iran conflict — “This is not our war. We will not be drawn into the conflict. That is not in our national interest.” UK government makes its stance clear on the Middle East conflict.#Iran #Starmer #UK pic.twitter.com/8FwD4vlXJ2 — NewsMatrix (@PabanSingh82441) April 1, 2026

Iran Attack on Amazon: इराणचा ॲमेझॉनवर हल्ला; गुगल, ॲपलसह १४ दिग्गज टेक कंपन्या रडारवर

ट्रम्प यांचा ‘नाटो’ देशांवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच युरोपीय देशांना ‘स्वार्थी’ संबोधले होते. इटली आणि स्पेनने अमेरिकन लढाऊ विमानांना आपले लष्करी तळ वापरण्यास मज्जाव केल्याने ट्रम्प संतापले आहेत. त्यांनी नाटोमधून बाहेर पडण्याचे संकेतही दिले आहेत. मंगळवारी ट्रम्प यांनी थेट ब्रिटनला दोन तुकड्यांत सुनावले होते की, “जर ब्रिटनने या युद्धात अमेरिकेला साथ दिली नाही, तर भविष्यात अमेरिका ब्रिटनला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही.“

‘होर्मुज सामुद्रधुनी’ आणि तेलाचे राजकारण

जगातील 20% तेल आणि वायूचा पुरवठा ‘होर्मुज सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) या मार्गावरून होतो. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने हा मार्ग बंद केला आहे. यावर भाष्य करताना ट्रम्प यांनी ब्रिटनवर तंज कसला होता की, “जर ब्रिटनला या मार्गावरून तेल हवे असेल, तर त्यांनी स्वतः तिथे जाऊन तो मार्ग खुला करावा. जर ते शक्य नसेल, तर त्यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी करावे.“

युद्धाऐवजी कूटनीतीवर ब्रिटनचा भर; ‘ग्लोबल समिट’चे आयोजन

युद्धात सामील होण्यास नकार दिला असला तरी, जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबाबत पंतप्रधान स्टार्मर गंभीर आहेत. होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी स्टार्मर यांनी ब्रिटनमध्ये एक ‘ग्लोबल समिट’ (जागतिक शिखर परिषद) बोलावली आहे. या परिषदेत आतापर्यंत 35 देशांनी सहभागी होण्याची पुष्टी केली आहे. युद्धात थेट सामील न होता, केवळ कूटनीतिक आणि सुरक्षात्मक मार्गांनी तेलाची पुरवठा साखळी पुन्हा कशी सुरू करता येईल, हा या समिटचा मुख्य उद्देश आहे. ब्रिटनच्या या भूमिकेमुळे आता अमेरिका यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

War Strategy : असे थांबले युद्ध! अमेरिका-इराण युद्धाच्या अर्धवट समाप्तीमागे दडली आहेत ‘ही’ अब्जावधींचे 5 गुपिते, वाचा सविस्तर

Web Title: Prime minister keir starmer delivers a sharp rebuttal following trumps warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

H1B Visa : अमेरिकेत इमिग्रेशन अर्ज प्रक्रियेत मोठे बदल; जाणून घ्या भारतीयांच्या ग्रीन कार्ड आणि वर्क परमिटवर काय होणार परिणाम?
1

H1B Visa : अमेरिकेत इमिग्रेशन अर्ज प्रक्रियेत मोठे बदल; जाणून घ्या भारतीयांच्या ग्रीन कार्ड आणि वर्क परमिटवर काय होणार परिणाम?

Donald Trump : तुर्कस्तानमध्ये US राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हत्येचे सावट; ‘एअर फोर्स वन’ सोडले अन् केटरिंग ट्रकमधून काढला पळ
2

Donald Trump : तुर्कस्तानमध्ये US राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हत्येचे सावट; ‘एअर फोर्स वन’ सोडले अन् केटरिंग ट्रकमधून काढला पळ

Kariba Lake Tragedy: जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित सरोवरात भीषण अपघात; 160 प्रवाशांची बोट उलटून 15 ठार, 27 बेपत्ता
3

Kariba Lake Tragedy: जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित सरोवरात भीषण अपघात; 160 प्रवाशांची बोट उलटून 15 ठार, 27 बेपत्ता

Typhoon Dolphin: चीनमध्ये ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचे थैमान! मुसळधार पावसासह महापुर; 10 लाखांहून अधिक नागरिक सुरक्षित स्थळी हलवले
4

Typhoon Dolphin: चीनमध्ये ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचे थैमान! मुसळधार पावसासह महापुर; 10 लाखांहून अधिक नागरिक सुरक्षित स्थळी हलवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.