Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Putin on Taliban : मोदींचे परममित्र पुतिन यांनी केली पाकिस्तानची कोंडी; अफगाण तालिबानच्या भविष्यरेषेवर पडणार रशियन रणनीतीची छाप

रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin यांनी अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर अत्यंत स्पष्ट भूमिका घेत तालिबान सरकार ही वास्तवात अस्तित्वात असलेली सत्ता असून ती मान्य करावी लागेल, असे ठामपणे सांगितले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 06, 2025 | 10:33 AM
Putin called the Taliban a reality and backed engagement with Kabul

Putin called the Taliban a reality and backed engagement with Kabul

Follow Us
Close
Follow Us:
  1. पुतिन यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकार ही एक ‘वास्तविकता’ असल्याचे ठामपणे मान्य केले.
  2. तालिबान दहशतवादाविरुद्ध लढत असल्याचा दावा करून पाकिस्तानच्या आरोपांना थेट छेद दिला.
  3. तालिबानशी संपर्क ठेवणे हेच स्थिरतेसाठी आवश्यक असल्याचे रशियाने स्पष्ट केले.

Putin Taliban reality statement : जागतिक राजकारणात सातत्याने चर्चेत असलेल्या अफगाणिस्तानातील सत्तासंघर्षावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपली परखड आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबान (Afghanistan Taliban) शासन ही एक नाकारता न येणारी ‘वास्तविकता’ असल्याचे सांगत, आंतरराष्ट्रीय समुदायाने या स्थितीकडे डोळेझाक करून चालणार नाही, असे स्पष्ट केले. पुतिन यांच्या या विधानामुळे केवळ पाकिस्तानच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुतिन यांनी ही भूमिका इंडिया टुडे या माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तालिबानचे पूर्ण नियंत्रण आहे आणि ते वास्तव स्वीकारले पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आलेले तालिबान सरकार जगासाठी चिंतेचा विषय असला तरी प्रत्यक्षात तेच तेथील प्रशासन चालवत आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे हे प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे. संपर्क न ठेवता स्वतःला सुरक्षित ठेवल्याचे फक्त भास निर्माण होतात, परंतु प्रत्यक्षता वेगळी असते, असा इशाराही पुतिन यांनी दिला.

याचवेळी पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या मोठ्या आरोपांना पुतिन यांनी थेट आव्हान दिले. पाकिस्तानने सातत्याने असा दावा केला आहे की तालिबान दहशतवादी संघटनांना समर्थन देत असून, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) सारख्या संघटनांना अफगाणिस्तानच्या भूमीत खुलेपणे काम करण्यास मदत करत आहे. मात्र पुतिन यांनी हे आरोप खोटे असल्याचे सूचित करत, तालिबान उलटपक्षी दहशतवाद्यांविरोधात लढत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की तालिबान सरकारने अफू उत्पादनावरही बंदी घातली असून, इस्लामिक स्टेटसारख्या टोकाच्या संघटनांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आपणच सूर्य, बाकी सावल्या’ असं म्हणत Trumpने पुन्हा बढाया मारल्या; नोबेल पारितोषिक न मिळाल्याने अमेरिकेने देऊ केला ‘हा’ पुरस्कार

रशियाने तालिबान सरकारशी औपचारिक संवाद प्रस्थापित करण्यामागेही एक ठोस कारण असल्याचे पुतिन यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील परिस्थितीवर सकारात्मक प्रभाव पडावा यासाठी सध्याच्या सत्तेशी संपर्क ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. “संपर्क न ठेवण्यापेक्षा संपर्क ठेवणे कधीही चांगले. त्यातून संवादाचे दार खुले राहते आणि स्थैर्य निर्माण करण्याची शक्यता वाढते,” असे पुतिन म्हणाले. या भूमिकेमुळे अफगाणिस्तानाबाबत रशियाची नीति अधिक व्यावहारिक आणि वास्तववादी असल्याचे दिसून येते.

A major setback for Pakistan President Putin has stated—contrary to Pakistan’s official stance—that the Taliban are clearly in control of the situation, and the Afghan government is taking many measures to counter terrorism and terrorist organizations pic.twitter.com/SeQfqMsJ1R — Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) December 5, 2025

credit : social media and Twitter 

राजकीय विश्लेषकांच्या मते, पुतिन यांच्या या विधानामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय दाव्यांना मोठा झटका बसला आहे. आतापर्यंत जी जबाबदारी तालिबानवर ढकलली जात होती, ती आता पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेच्या अपयशाकडेही निर्देश करत आहे. याचा परिणाम भविष्यातील आंतरराष्ट्रीय चर्चांवर आणि करारांवरही पडण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan CDF : शाहबाज शरीफ यांचा डाव पालटला; पाकिस्तानच्या राजकारणात आला नवा ट्विस्ट, ‘Asim Munir’च पाकिस्तानचे सर्वेसर्वा

पुतिन यांच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे अफगाणिस्तान हा विषय पुन्हा एकदा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. अमेरिका, चीन, भारत आणि युरोपियन देश आता या नव्या भूमिकेवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अफगाणिस्तानातील सध्याची राजवट, तिची भूमिका आणि जागतिक राजकीय समीकरणे यांचा येत्या काळात नवा, वेगळा अर्थ लावला जाईल, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुतिन यांनी तालिबानला समर्थन का दिले?

    Ans: अफगाणिस्तानातील वास्तवस्थितीचा स्वीकार करून तेथील घडामोडींवर थेट आणि सकारात्मक प्रभाव टाकणे.

  • Que: पाकिस्तान यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीत आला आहे का?

    Ans: पुतिन यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचे आरोप कमकुवत ठरले असून, त्यांचा दहशतवादविरोधातील दावा प्रश्नांकित झाला आहे.

  • Que: याचा भारत आणि जगावर काय परिणाम होईल?

    Ans: त्यामुळे अफगाणिस्तानाबाबत नवी रणनीती ठरवली जाईल आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय संबंधांवर याचा मोठा प्रभाव पडू शकतो.

Web Title: Putin called the taliban a reality and backed engagement with kabul

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • Afghanistan taliban
  • pakistan
  • PM Narendra Modi
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

राष्ट्राध्यक्ष Putin स्मार्टफोनपासून दूर का? अखेर उघड झालं अनोखं कारण, वाचाल तर तुम्हीही थक्का व्हाल
1

राष्ट्राध्यक्ष Putin स्मार्टफोनपासून दूर का? अखेर उघड झालं अनोखं कारण, वाचाल तर तुम्हीही थक्का व्हाल

पुतीन यांची Aurus Senat कार भारी की Toyota Fortuner? जाणून घ्या किंमत
2

पुतीन यांची Aurus Senat कार भारी की Toyota Fortuner? जाणून घ्या किंमत

Explainer: किती जुनी आहे भारत-रशियाची मैत्री? कित्येक दशकांच्या मैत्रीच्या नात्याचा इतिहास, वाचा सविस्तर
3

Explainer: किती जुनी आहे भारत-रशियाची मैत्री? कित्येक दशकांच्या मैत्रीच्या नात्याचा इतिहास, वाचा सविस्तर

Range Rover नाही तर ‘या’ SUV मधून PM Modi आणि Putin यांचा प्रवास, कारला VIP नंबर प्लेट देखील नाही
4

Range Rover नाही तर ‘या’ SUV मधून PM Modi आणि Putin यांचा प्रवास, कारला VIP नंबर प्लेट देखील नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.