Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War: ‘तुमचाच पैसा, तुमचीच शांती!’ अमेरिकेतील रशियन निधीतून होणार युक्रेनची पुनर्बांधणी; पुतिन यांचा मोठा डाव

Russia-Ukraine War: रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले की अमेरिकेत गोठवलेल्या रशियन मालमत्तेचा वापर युक्रेनमधील युद्धग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी आणि ट्रम्पच्या 'शांतता मंडळाला' निधी देण्यासाठी केला जाऊ शकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 22, 2026 | 09:55 AM
putin offers frozen assets for ukraine reconstruction trump peace board 2026

putin offers frozen assets for ukraine reconstruction trump peace board 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक
  • युक्रेनची पुनर्बांधणी
  • ट्रम्प-पुतिन मैत्रीचे नवे पर्व

Putin Trump Peace Board $1 billion 2026 : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी (२२ जानेवारी) एक ऐतिहासिक घोषणा केली, ज्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी प्रस्तावित केलेल्या ‘शांतता मंडळा’ (Board of Peace) मध्ये सामील होण्यासाठी आणि गाझासह युक्रेनमधील शांतता प्रक्रियेसाठी रशिया आपला गोठवलेला निधी देण्यास तयार असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.

शांतता मंडळासाठी १ अब्ज डॉलर्सचा निधी

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियन सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलताना सांगितले की, “रशियाचे पॅलेस्टिनी जनतेशी असलेले विशेष संबंध लक्षात घेता, आम्ही ट्रम्प यांच्या शांतता मंडळासाठी १ अब्ज डॉलर्सची देणगी देण्यास तयार आहोत.” विशेष म्हणजे, हा पैसा रशिया आपल्या तिजोरीतून नव्हे, तर अमेरिकेने २०२२ मध्ये गोठवलेल्या ($४ ते ५ अब्ज) रशियन मालमत्तेतून देणार आहे. पुतिन यांच्या या विधानामुळे चेंडू आता ट्रम्प प्रशासनाच्या कोर्टात गेला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Greenland Deal: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा ‘यू-टर्न’! युरोपवरील टॅरिफ बॉम्ब निकामी; ग्रीनलँडसाठी नाटोसोबत झाला ऐतिहासिक करार

युक्रेनच्या पुनर्बांधणीचा नवा मार्ग

केवळ ‘शांतता मंडळ’च नाही, तर युक्रेनमधील उद्ध्वस्त झालेल्या शहरांच्या पुनर्बांधणीसाठीही रशियाने सहकार्याचा हात पुढे केला आहे. पुतिन यांच्या मते, रशिया आणि युक्रेनमध्ये औपचारिक शांतता करार झाल्यानंतर, अमेरिकेतील रशियाचा जो उर्वरित गोठवलेला निधी आहे, तो युद्धग्रस्त भागांच्या विकासासाठी वापरता येईल. “आम्ही या पर्यायावर अमेरिकन प्रशासनाच्या प्रतिनिधींसोबत (स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुश्नर) सविस्तर चर्चा करण्यास तयार आहोत,” असेही त्यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात नमूद केले.

❗️Russia ready to contribute $1 BILLION to Board of Peace, from Russian assets FROZEN by previous US admin — Putin Remaining frozen funds could be used to ‘REBUILD territories that suffered during hostilities between Russia and Ukraine’ Once peace deal signed https://t.co/tXsEQnFM9l pic.twitter.com/reKU5txAN9 — RT (@RT_com) January 21, 2026

credit – social media and Twitter

विटकॉफ आणि कुश्नर यांची मॉस्को भेट

डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि त्यांचे जावई जेरेड कुश्नर गुरुवारी (२२ जानेवारी) मॉस्कोमध्ये पुतिन यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत युक्रेनमधील युद्धविराम, प्रादेशिक सीमांचे वाटप आणि जप्त केलेल्या मालमत्तेचा वापर यांवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. विटकॉफ यांनी अलीकडेच सांगितले होते की, रशियाने स्वतःहून बैठकीसाठी बोलावणे धाडले आहे, जे शांततेच्या दिशेने एक ‘मोठे विधान’ आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?

युक्रेनची भूमिका आणि आव्हाने

पुतिन यांनी हा प्रस्ताव मांडला असला तरी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ‘सन्मानजनक शांतते’साठी आग्रही आहेत. युक्रेनला भीती आहे की, या करारामुळे त्यांना आपला काही भूभाग रशियाला कायमचा द्यावा लागू शकतो. मात्र, ट्रम्प प्रशासनाचा रशियाकडे असलेला कल आणि पुतिन यांनी मांडलेली आर्थिक मदतीची योजना पाहता, युरोपीय देश आणि युक्रेनवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुतिन यांनी किती निधी देण्याची घोषणा केली आहे?

    Ans: पुतिन यांनी ट्रम्प यांच्या 'शांतता मंडळा'साठी अमेरिकेतील गोठवलेल्या रशियन मालमत्तेतून १ अब्ज डॉलर्स देण्याची तयारी दर्शवली आहे.

  • Que: या निधीचा वापर कुठे केला जाणार आहे?

    Ans: हा निधी गाझामधील शांतता आणि रशिया-युक्रेन करारानंतर युद्धग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.

  • Que: स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुश्नर मॉस्कोला का जात आहेत?

    Ans: ट्रम्प यांचे हे दूत रशिया-युक्रेन युद्धावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुतिन यांच्याशी चर्चा करण्यास मॉस्कोला गेले आहेत.

Web Title: Putin offers frozen assets for ukraine reconstruction trump peace board 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Trump Greenland Deal: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा ‘यू-टर्न’! युरोपवरील टॅरिफ बॉम्ब निकामी; ग्रीनलँडसाठी नाटोसोबत झाला ऐतिहासिक करार
1

Trump Greenland Deal: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा ‘यू-टर्न’! युरोपवरील टॅरिफ बॉम्ब निकामी; ग्रीनलँडसाठी नाटोसोबत झाला ऐतिहासिक करार

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?
2

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!
3

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

US Tariffs on India: ट्रम्पची टॅरिफ योजना फसली! भारताचा ‘हा’ गुप्त डाव यशस्वी
4

US Tariffs on India: ट्रम्पची टॅरिफ योजना फसली! भारताचा ‘हा’ गुप्त डाव यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.