Quad nations condemn Pahalgam attack killing 26 civilians demand justice
India Quad Relations : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. क्वाड देशांनी (अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत) या भयंकर हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हल्लेखोर, आयोजक आणि आर्थिक मदतदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर, वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनाने पाकिस्तानच्या दहशतवादाला समर्थन देणाऱ्या धोरणावर थेट बोट ठेवले, आणि जागतिक स्तरावर त्याचा दबाव अधिक वाढवला आहे.
क्वाड देशांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे, “आम्ही पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात सहभागी असलेले, योजना आखणारे आणि आर्थिक मदत करणारे सर्वजण लवकरात लवकर न्यायाच्या कक्षेत आणले गेले पाहिजेत.” या वक्तव्यात सीमापार दहशतवादालाही स्पष्ट शब्दांत विरोध करण्यात आला असून, संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांना तपासात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की, “दहशतवाद कोणत्याही स्वरूपात असो, त्याला आमचा ठाम विरोध आहे. जागतिक शांततेसाठी सर्व देशांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.”
The foreign ministers of the US, India, Japan, and Australia condemned the April 22 Pahalgam terror attack and urged that those responsible for the killing of 26 people be brought to justice.
Read More: https://t.co/UGUDLRRsro#PahalgamTerrorAttack #News pic.twitter.com/gBanlqA7nC
— IndiaToday (@IndiaToday) July 2, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांत नवा अध्याय; एस. जयशंकर-पेनी वोंग भेटीत द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा
क्वाड देशांकडून मिळालेला हा पाठींबा भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाला अधिक बळकटी देणारा ठरला आहे. भारताने या आंतरराष्ट्रीय सहकार्याचे स्वागत करताना म्हटले की, “हा पाठिंबा आमच्या सुरक्षिततेसाठी आणि न्याय मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.” या घटनांमुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढणार हे निश्चित. शाहबाज शरीफ सरकार आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. त्यांच्या निष्क्रिय धोरणांमुळे पाकिस्तानचे नाव दहशतवादाच्या समर्थनार्थ सतत घेतले जात आहे.
भारतावर सतत आरोप करणारा पाकिस्तान आता स्वतःच जगाच्या न्यायालयात उभा राहिल्यासारखा परिस्थितीत सापडला आहे. क्वाड देशांच्या या वक्तव्यानंतर, अंतरराष्ट्रीय समाजात पाकिस्तानची प्रतिमा अधिक गडद होत चालली आहे. विशेषतः जेव्हा क्वाड देश थेट म्हणतात की, “सीमापार दहशतवाद असो किंवा कोणताही हिंसक प्रकार आम्ही एकत्र त्याविरोधात उभे आहोत,” तेव्हा हा संदेश केवळ दहशतवाद्यांना नव्हे, तर त्यांना पाठींबा देणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशांनाही थेट इशारा ठरतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World UFO Day 2025 : जागतिक UFO दिन म्हणजे काय? जाणून घ्या ‘या’ दिवसामागचा खास इतिहास
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या बाजूने उभे राहणारे क्वाड देशांचे वक्तव्य ही केवळ सहानुभूती नाही, तर एक स्पष्ट रणनिती आहे. भारताच्या सुरक्षेवर हल्ला म्हणजे आता जगाच्या शांततेवर हल्ला असल्याचे संकेत यातून मिळतात. या घोषणेमुळे पाकिस्तान सरकार व लष्कर मोठ्या अडचणीत आले आहेत. भारताने हा मुद्दा यापुढे संयुक्त राष्ट्र आणि इतर जागतिक मंचांवर अधिक जोमाने मांडल्यास, दहशतवादाचा अड्डा म्हणून पाकिस्तानचा खरा चेहरा पूर्णतः उघडकीस येण्याची शक्यता आहे.