Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Thackeray Brothers Alliance |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Green Card: H-1B व्हिसा कर्मचाऱ्यांना दिलासा, गुगल २०२६ पासून ग्रीन कार्ड प्रक्रिया पुन्हा होणार सुरू 

H-1B व्हिसा सारख्या तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो गुगल कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांची ग्रीन कार्ड प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे, त्यांच्यासाठी आता आशेचा किरण आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 24, 2025 | 12:38 PM
Google Green Card: H-1B व्हिसा कर्मचाऱ्यांना दिलासा, गुगल २०२६ पासून ग्रीन कार्ड प्रक्रिया पुन्हा होणार सुरू 

Google Green Card: H-1B व्हिसा कर्मचाऱ्यांना दिलासा, गुगल २०२६ पासून ग्रीन कार्ड प्रक्रिया पुन्हा होणार सुरू 

Follow Us
Close
Follow Us:
  • २०२६ मध्ये गुगल पुन्हा सुरू करणार ग्रीन कार्ड प्रक्रिया
  • हजारो गुगल कर्मचाऱ्यांना H-1B व्हिसासाठी मिळेल दिलासा
  • यूएस रोजगार-आधारित ग्रीन कार्ड महत्त्वाचा टप्पा
Google Green Card: H-1B व्हिसा सारख्या तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो गुगल कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांची ग्रीन कार्ड प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे, त्यांच्यासाठी आता आशेचा किरण आहे. गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना कळवले आहे की, २०२६ पासून मोठ्या प्रमाणात ग्रीन कार्ड प्रायोजकत्व प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची त्यांची योजना आहे. यामुळे दीर्घकाळ अनिश्चिततेत जगणाऱ्या H-1B व्हिसा धारकांना फायदा होऊ शकतो. अंतर्गत गुगल न्यूजलेटरनुसार, कंपनी २०२६ मध्ये पोईआरएम अर्ज वाढवेल.

हेही वाचा: Himanshi Khurana : प्रेम की घात? भारतीय डिजिटल क्रिएटर हिमांशी खुराणा पहिले झाली बेपत्ता अन् सकाळी सापडला मृतदेह…

पीईआरएम, किंवा प्रोग्राम इलेक्ट्रॉनिक रिव्ह्यू मॅनेजमेंट, यूएस रोजगार-आधारित ग्रीन कार्ड प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कंपन्या सिद्ध करतात की, परदेशी कर्मचारी नियुक्त केल्याने अमेरिकन कामगारांवर नकारात्मक परिणाम होणार नाही आणि या भूमिकेसाठी कोणतेही पात्र अमेरिकन उमेदवार उपलब्ध नाहीत. टेक कंपन्या सामान्यतः कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या व्हिसावरून कायमस्वरूपी निवासस्थानात स्थानांतरित करण्यासाठी हा मार्ग वापरतात. अंतर्गत मेमोमध्ये असे म्हटले आहे, पीईआरएम साठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांशी २०२६ च्या पहिल्या तिमाहीत गुगलच्या बाह्य इमिग्रेशन कायदा फर्म्स संपर्क साधतील.

हेही वाचा: Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL

जरी गुगलने ही योजना सार्वजनिकरित्या जाहीर केलेली नसली तरी, अंतर्गत माध्यमाच्या प्रत समोर आल्यानंतर ही बातमी चर्चेत आली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे टिप्पणी करण्यास नकार दिला. या संबधित अधिकृत माहिती येण्याची वाट पाहत आहेत. अधिकृत माहिती समोर येताच अमेरिकेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या अतिरिक्त टॅरीफ आणि H-1B व्हिजाचे बदललेले आणि कठीण केलेले नियम यामुळे परदेशी नागरिकांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.

अलीकडेच, अमेरिकेत H-1B व्हिसासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीयांना मोठा झटका लागला आहे. अचानक व्हिसा नूतनीकरणाच्या दूतावासाने सर्व अपॉइंटमेंट रद्द केल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Relief for h 1b visa holders google to resume green card processing from 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • google
  • H-1B Visa

संबंधित बातम्या

Google ची मोठी सेवा सुरू! आपत्कालीन परिस्थितीत वाचवेल जीव, ELS आहे तरी काय?
1

Google ची मोठी सेवा सुरू! आपत्कालीन परिस्थितीत वाचवेल जीव, ELS आहे तरी काय?

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 
2

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 

Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
3

Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.