कॅनडातील टोरंटोमध्ये भारतीय महिला हिमांशी खुरानाची हत्या; तिच्या प्रियकराविरुद्ध संपूर्ण देशात वॉरंट जारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Himanshi Khurana murder case Toronto 2025 : कॅनडातील (Canada) टोरंटो शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. ३० वर्षीय भारतीय नागरिक हिमांशी खुराणा हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने केवळ कॅनडातील भारतीय समुदायच नाही, तर संपूर्ण भारत देश हादरला आहे. टोरंटो पोलिसांनी या हत्येप्रकरणी हिमांशीचा प्रियकर अब्दुल गफूरी याला मुख्य आरोपी ठरवले असून त्याच्या विरोधात संपूर्ण कॅनडात अटक वॉरंट जारी केले आहे. ही घटना ‘घरगुती हिंसाचाराचा’ एक भीषण प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशी खुराणा शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:४० च्या सुमारास बेपत्ता झाली होती. तिला शेवटचे टोरंटोमधील स्ट्रॅचन अव्हेन्यू परिसरात पाहिले गेले होते. ती घरी न परतल्याने तिच्या निकटवर्तीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली, परंतु शनिवारी सकाळी ६:३० वाजता एका घरातून हिमांशीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास ‘खून’ म्हणून सुरू केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : LVM3-M6 : मोफत इंटरनेटच्या दिशेने ISROचे लक्षणीय पाऊल; ‘Bluebird-2 Satellite’ मुळे होणार स्मार्टफोन क्रांती, वाचा कसे?
तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. ३२ वर्षीय अब्दुल गफूरी आणि हिमांशी हे एकमेकांना आधीपासून ओळखत होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हत्येत झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. अब्दुलविरुद्ध ‘फर्स्ट-डिग्री मर्डर’ (नियोजित हत्या) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी त्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून तो ‘धोकादायक’ असल्याचे नागरिकांना बजावले आहे.
TORONTO POLICE ASKING FOR INFORMATION ON ABDUL GHAFOORI ACCUSED OF MURDERING HIMANSHI KHURANA. Himanshi Khurana, 30, of Toronto has been identified as the victim in the city’s 40th homicide of 2025.
Toronto Police say Khurana was reported missing on Friday, Dec 19, around 10:41… pic.twitter.com/JgNv0EhIMG — Rahul Shivshankar (@RShivshankar) December 24, 2025
credit : social media and Twitter
टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, “एका तरुण भारतीय मुलीची अशा प्रकारे झालेली हत्या अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही हिमांशीच्या कुटुंबासोबत आहोत आणि कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत.” दूतावासाने हिमांशीचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी कॅनडा सरकारवर दबाव वाढवला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’
२०२५ सालात टोरंटोमध्ये झालेली ही ४० वी हत्या आहे. गेल्या काही महिन्यांत कॅनडामध्ये भारतीय नागरिक आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हिमांशी खुराणा ही एक ‘डिजिटल क्रिएटर’ म्हणून सोशल मीडियावर सक्रिय होती. तिच्या अशा अकाली निधनाने परदेशात स्थायिक होणाऱ्या तरुणांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Ans: हिमांशी खुराणाची हत्या १९ डिसेंबर २०२५ रोजी कॅनडातील टोरंटो शहरात झाली. तिचा मृतदेह शनिवारी सकाळी एका घरात सापडला.
Ans: पोलिसांनी हिमांशीचा प्रियकर अब्दुल गफूरी (३२ वर्षे) याला मुख्य संशयित मानले असून त्याच्याविरुद्ध हत्येचे वॉरंट जारी केले आहे.
Ans: भारतीय वाणिज्य दूतावास कॅनेडियन पोलिसांच्या सतत संपर्कात असून पीडित कुटुंबाला कायदेशीर आणि पार्थिव भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे.






