Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“AI मध्ये भारत पुढे, पण टेस्ट रँकिंगमध्ये आम्हीच सरस!” Rishi Sunak यांनी सांगितला पंतप्रधान मोदींसोबतचा ‘तो’ मजेशीर किस्सा

ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी भारताच्या वाढत्या ताकदीची दखल घेत, भारत आता खऱ्या अर्थाने 'ग्लोबल एआय सुपरपावर' बनल्याची कबुली दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 25, 2026 | 03:43 PM
Rishi Sunak यांनी सांगितला पंतप्रधान मोदींसोबतचा 'तो' मजेशीर किस्सा (photo Credit- X)

Rishi Sunak यांनी सांगितला पंतप्रधान मोदींसोबतचा 'तो' मजेशीर किस्सा (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • AI मध्ये भारत पुढे, पण टेस्ट रँकिंगमध्ये आम्हीच सरस!
  • Rishi Sunak यांनी सांगितला पंतप्रधान मोदींसोबतचा ‘तो’ मजेशीर किस्सा
  • तंत्रज्ञान आणि सुरक्षेसाठी वाढते सहकार्य
Rishi Sunak Modi AI comment: तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) क्षेत्रात भारताने मारलेली गरुडझेप आता जगाला थक्क करत आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी भारताच्या वाढत्या ताकदीची दखल घेत, भारत आता खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल एआय सुपरपावर’ बनल्याची कबुली दिली आहे. एका अलीकडील कार्यक्रमात बोलताना सुनक यांनी स्पष्ट केले की, तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या बाबतीत भारत आणि ब्रिटनचे संबंध आता एका ऐतिहासिक उंचीवर पोहोचले आहेत.

स्टॅनफोर्ड ‘एआय’ इंडेक्समध्ये ब्रिटनला टाकले मागे

ऋषी सुनक यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या प्रसिद्ध ‘AI इंडेक्स’ चा हवाला देत सांगितले की, या जागतिक क्रमवारीत भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. भारताची ही प्रगती केवळ संख्यात्मक नसून ती गुणात्मक असल्याचेही त्यांनी मान्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत झालेल्या संवादातील एक रंजक आठवण शेअर केली. सुनक हसत म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींना गमतीने म्हणालो होतो की, एआय क्षेत्रात जरी भारताने आम्हाला मागे टाकले असले, तरी आयसीसी (ICC) टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये इंग्लंड अजूनही भारताच्या पुढे आहे.” त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

#WATCH | London | Former UK PM Rishi Sunak says, “According to the globally respected Stanford AI Index, both India and the UK are ranked as AI superpowers. Although India has recently overtaken the UK in the rankings, I reminded Prime Minister Modi at the summit that England… https://t.co/TtLbrJacK1 pic.twitter.com/aarvFX05K3 — ANI (@ANI) March 25, 2026

“… मोठे दुष्परिणाम होण्याची भीती”; Iran Israel युद्धावर पंतप्रधान मोदींचे मोठे भाष्य

AI नियमनाबाबत भारत-ब्रिटनची एकसमान भूमिका

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नियमनाबाबत भारत आणि ब्रिटनचा दृष्टिकोन पूर्णपणे मिळताजुळता असल्याचे सुनक यांनी नमूद केले. ते म्हणाले की, “युरोपीय महासंघाचे अत्यंत कडक नियम किंवा अमेरिकेचा अस्थिर पवित्रा स्वीकारण्याऐवजी, भारत आणि ब्रिटन एका व्यावहारिक मार्गाने जाण्यास प्राधान्य देत आहेत.” दोन्ही देश अशा तत्त्वांवर काम करत आहेत जे नवनवीन संशोधनांना चालना देतील आणि त्यावर अनावश्यक बंधने लादणार नाहीत. तंत्रज्ञानाचा विकास आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालणे समाजाच्या हिताचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तंत्रज्ञान आणि सुरक्षेसाठी वाढते सहकार्य

दोन्ही देशांमधील तांत्रिक सुरक्षेच्या करारांवर भाष्य करताना सुनक यांनी ब्रिटनच्या ‘AI सेफ्टी इन्स्टिट्यूट’ आणि भारताने नुकत्याच स्थापन केलेल्या अशाच प्रकारच्या संस्थेमधील समन्वयावर भर दिला. त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची तुलना केली, “ज्याप्रमाणे गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीमुळे दहशतवादासारख्या मोठ्या संकटांशी लढण्यास मदत झाली, त्याचप्रमाणे एआय संस्थांमधील सहकार्य आपल्याला भविष्यातील तांत्रिक जोखमींपासून वाचवेल.” ही भागीदारी केवळ डेटा शेअरिंगपुरती मर्यादित नसून सुरक्षित डिजिटल भविष्याचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यातील शक्तिशाली भागीदारी आणि सुनक यांचे योगदान

आपल्या भाषणाच्या शेवटी सुनक यांनी  ‘यूके-इंडिया टेक्नॉलॉजी सिक्युरिटी इनिशिएटिव्ह’ चा उल्लेख केला. त्यांनी या उपक्रमाला 21 व्या शतकातील सर्वात शक्तिशाली सुरक्षा आणि तांत्रिक भागीदारी म्हटले आहे. उल्लेखनीय आहे की, ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे आणि पहिले हिंदू पंतप्रधान म्हणून इतिहास रचला आहे. ऑक्टोबर 2022 ते जुलै 2024 या आपल्या कार्यकाळात त्यांनी भारत आणि ब्रिटनमधील सामरिक आणि तांत्रिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली होती.

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल युद्धात भारताने करावी मध्यस्थी; संघर्ष पोहोचलाय अणूयुद्धाच्या उंबरठ्यावर

Web Title: Rishi sunak shares that amusing anecdote involving prime minister modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • ai
  • PM Narendra Modi
  • Rishi Sunak
  • World news

संबंधित बातम्या

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच
1

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
2

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय
3

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी
4

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.