जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व
Muslim Leaders : गेल्या काही जागतिक राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. विशेष करुन अमेरिकेत मोठा बदल झाला आहे. न्यूयॉर्कच्या महापौरमदी ममदानी यांची निवड झाली असून ते पहिले मुस्लिम महापौर ठरले आहेत.
नुकतेच न्यूयॉ़र्कच्या महापौर म्हणून ममदानींची निवड
Muslim Leaders in World : नवी दिल्ली : गेल्या काही काळात जगभारतील बहुसांस्कृतिक देशांमध्ये, लोकशाही व्यवस्थांमध्ये मोठे बदल घडत आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे मुस्लिम नेत्यांचा वाढता प्रभाव. अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि कॅनडा या देशांमध्ये मुस्लिम नेते समाजातील सर्व घटकांमध्ये प्रतिनिधीत्व करताना दिसत आहेत. अनेक मुस्लिम नेत्यांनी राजकारण्याच्या प्रवाहात आपले स्थान निर्माण केले आहे.
आता याचेच उदाहरण पाहायचे म्हणल्यास नुकत्याच न्यूयॉर्कमध्ये महापौर पदाच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीत भारतीय वंशाचे मुस्लिम नेते जोहरान ममदानी यांनी विजय मिळवला आहे. तसेच ममदानी यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाषण केले. यावेळी त्यांनी म्हटले की, भविष्य आपल्या हातात आहे आणि जुन्या राजकीय घराण्याला पराभूत करण्याचा एक नवा अध्या सुरु झाला आहे.
तर दुसरीकडे व्हर्जिनियामध्ये भारतीय वंशाच्या गजाला हाश्मी यांनी देखील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्या अमेरिकेच्या इतिहासात उच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या आहे. हाश्मी यांनी रिपब्लिकन उमेदवार जॉन रीड यांचा पराभव केला आहे.
तसेच अमेरिकेत इल्हान उमर, रशीदा तलैब या दोन मुस्लिम महिला खासदारांनी देखील इतिहास रचला आहे. इल्हान उमर या सोमालिया वशांच्या आहेत. त्यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या आहेत. तसेच त्यांनी सामाजिक न्याय, मानवाधिकार आणि स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढत लढली आहे. तर दुसरीकडे रशीदा तलैब या मिशिगनमध्ये खासमधून डेमोक्रॅट पक्षाच्या प्रभावी नेत्या ठरल्या आहे. रशीदा यांनी गरीबी, शिक्षण, पर्यावरण आणि समतेच्या मुद्यांवर लढा दिला आहे.
याशिवाय ब्रिटनमध्ये सादिक खान यांची २०१६ मध्ये महापौर पदी निवड करण्यात आली होती. ते ब्रिटनचे पहिले मुस्लिम महापौर ठरले होते. ब्रिटनच्या लेबर पक्षाचे प्रभावी नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी लंडनला हरित, समावेश आणि आधुनिक शहर बनवण्यासाठी लढत दिली. तसेच त्यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली सार्वजनिक वाहतूक सुधारणा, पर्यावर संवर्धन यांसारख्या गोष्टींना देखील प्राधान्य दिले.
युरोपमध्येही मुस्लिम राजकारण्यांचा ठसा उमटत आहे. फ्रान्समध्ये आम्या बूपे हे सर्वात तरुण मुस्लिम नेते असून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच साजिद करीम, सैयद कमाल यांनी देखील युरोपच्या संसदेत विविधता आणि धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर आपला ठसा निर्माण केला आहे.
कॅनडामध्ये लिबरल पक्षाचे प्रमुख मुस्लिम नेते यासर नकवी यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी ओटाव सेंटमधून प्रतिनिधीत्व केले आहे. समानता, स्थलांतर आणि सामाजिक कल्यांवर आधारित मुद्यांवर त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. २०२५ च्या निवडणुकांमध्ये कॅनडात १३ मुस्लिम खासदारांचीही निवड करण्यात आली होती.
यावरुन जगभरातील मुस्लिम नेत्यांच्या वाढत्या प्रभावाते दर्शन होते. स्पष्ट होते की, जागतिक राजकारणात एक प्रभावशाली आणि रचानात्मक भूमिकेत मुस्लिम नेत्यांचा प्रभाव वाढत आहे.