न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाच्या ममदानींची निवड; विजयी भाषणात 'धूम मचाले'चा दिसला जलवा Video viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Newyork mayoral Eelctions : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) न्यूयॉर्क सिटीच्या महापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत भारतीय वंशाचे मु्स्लिम नेते जोहरान ममदानी यांचा विजय झाला आहे. ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ठरवले आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच ममदानी आघाडीवर होते. दरम्यान त्यांच्या विजयानंतरच्या भाषणात एक हिंदी गाणे वाजले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय वंशाचे ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये उडवला विजयी गुलाल; बनले पहिले मुस्लिम महापौर
जोरहान ममदानी यांच्या विजयी घोषणेनंतर त्यांनी एक भाषण दिले होते. त्यांनी या भाषणात म्हटले की, हा विजय केवळ त्यांचा नसून नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वासाचा आणि एकतेचा विजय आहे. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरपासून ते सर्व कामागांपर्यंतच्या लोकांना आपल्या विजयाचे श्रेय दिले.
दरम्यान त्यांच्या विजयी घोषणेनंतर आणि भाषाणावेळी बॅकग्राऊंडमध्ये एक बॉलीवूड गाणे वाजले. बॉलीवूडमध्ये धूम मचाले चित्रपटाचे टायटल सॉन्ग वाजू लागले. याच क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
BIG NEWS 🚨 Dhoom Machale song was played in the background during the victory speech of Zohran Mamdani 😂😂😂😂 pic.twitter.com/4P8MDaK4ey — News Algebra (@NewsAlgebraIND) November 5, 2025
ममदानी यांनी आपल्या भाषणादरम्यान एक खळबळजनक विधान केले. त्यानंतर लगेचच या गाण्याचा थरार सुरु झाला. त्यांनी म्हटले की, आपण एक राजकीय वंश मोडला आहे, आणि त्यांनतर धूम मचाले धूम मचाले हे गाणे वाजले.
दुसरीकडे भारतीय वंशाच्या गजाला हाश्मी यांनी देखील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्या अमेरिकेच्या इतिहासात उच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या आहे. यामुळे त्यांच्या या विधानाला चांगलेच उधाण आले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जोहरान ममदानी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या विजयाने ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. ममदानी ३३ वर्षांच असून न्यूयॉर्क राज्य विनाधसेचे सदस्य आहेत. त्यांचा जन्म युगांडाच्या कंपालामध्ये झाला आहे. ममदानी यांनी त्यांच्या कॉलेजच्या पॅलस्टाईनमधील स्टुडंट्स फॉर या संस्थेची स्थापना केली होती. यातूनच त्यांना राजकारणात प्रवेश केला. त्यांनी न्ययूॉर्क शहरातील माजी महापौर ॲंड्र्यू कुओमा यांना महापौर पदाच्या निवडणूकीत पराभूत केले आहेत.
प्रश्न १. न्यूयॉर्कच्या महापौरपदी कोणाची निवड झाली?
अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीच्या महापौर पदी भारतीय वंशाचे मु्स्लिम नेते जोहरान ममदानी यांची निवड झाली आहे.
प्रश्न २. जोहरान ममदानी यांच्या भाषणादरम्यान कोणते गाणे वाजले?
जोहरान ममदानी यांच्या विजयी घोषणेनंतर आणि भाषणावेळी बॅकग्राऊंडमध्ये एक बॉलीवूड गाणे वाजले. बॉलीवूडमध्ये धूम मचाले चित्रपटाचे टायटल सॉन्ग वाजू लागले.






