Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शत्रू देशांनो सावधान! रशिया भारताला देणार ‘ही’ खतरनाक शस्त्रप्रणाली; काय आहेत वैशिष्ट्ये? पहाच

रशिया आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध हे सर्व जग जाणून आहे. रशिया हा भारताचा अत्यंत जुना आणि विश्वासू मित्र आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 12, 2024 | 02:26 PM
शत्रू देशांनो सावधान! रशिया भारताला देणार 'ही' खतरनाक शस्त्रप्रणाली; काय आहेत वैशिष्ट्ये? पहाच

शत्रू देशांनो सावधान! रशिया भारताला देणार 'ही' खतरनाक शस्त्रप्रणाली; काय आहेत वैशिष्ट्ये? पहाच

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: रशिया आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध हे सर्व जग जाणून आहे. रशिया हा भारताचा अत्यंत जुना आणि विश्वासू मित्र आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात देखील अत्यंत चांगले असे संबंध आहेत.  दरम्यान भारत आणि रशिया यांच्यात अनेक प्रकारचे करार होत असतात. अनेक आधुनिक शस्त्र प्रणाली आपण रशियाकडून खरेदी करत असतो. आता देखील रशिया आपल्याला एक आधुनिक अशा प्रकारचे शस्त्र पुरवणार आहे. भारताने आपली एअर सिस्टिम मजबूत करण्यासाठी एक करार केला आहे.

भारत डायनामिक्स लिमिटेडने रशियासोबत एक करार केला आहे. हा करार आधुनिक पॅन्टसिर एअर डीफेन्स गन सिस्टिमसाठी झाली आहे. हा करार रोसोबोरोन एक्सपोर्टसोबत केला आहे. यामुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. दरम्यान पॅन्टसिर शस्त्रप्रणाली कशाप्रकारे काम करते आणि याचा फायदा कसा होतो हे जाणून घेऊयात.

पॅन्टसिर एअर डीफेन्स मिसाईल गन सिस्टिम ही मोबाइल शॉर्ट रेंज डीफेन्स सिस्टिम आहे. यामध्ये मिसाईल आणि गन या दोन्ही फिट होतात. ही सिस्टिम म्हणजे परफेक्ट सुरक्षा असल्याचे रशियाच्या कंपनीने म्हटले आहे. लहान लष्करी, औद्यागिक, प्रशासनिक फॅसीलिटीज हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी ही एअर डीफेन्स सिस्टिम तयार करण्यात आली आहे.

या सिस्टिमचे खास वैशिष्ट्ये काय? 

पॅन्टसिर एस -१ एअर डीफेन्स सिस्टिम ही एक हजार मीटर प्रती सेकंदाच्या वेगाने हालचाल करते. याच्या मदतीने एकाच वेळेस चार टार्गेट लक्ष्य करता येतात. ही आधुनिक आणि ट्रॅकिंग रडार सिस्टिम आहे. ही एअर डीफेन्स सिस्टिम ३६ किमी लांब आणि १५ किमी लांब उंचीवरील टार्गेट शोधून काढते. काही लक्ष्य ही एअर डीफेन्स सिस्टिम हवेतच नष्ट करते.

हेही वाचा: युक्रेन-रशिया युद्धात भारत करणार मधस्थी; अजित डोवाल यांच्यावर असणार कमान

युक्रेन-रशिया युद्धात भारत करणार मधस्थी

युक्रेन-रशिया या दोन्ही देशांतील युद्ध अद्यापही सुरुच आहे. हे युद्ध लवकर थांबेल असे वाटत होते. मात्र, अजूनही या दोन्ही देशांत समझोता झाला नसल्याचे समोर आले आहे. असे असताना आता युक्रेन-रशिया युद्धात भारताने मध्यस्थी करावी, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच म्हटले होते. त्यानंतर आता भारतानेही मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्याकडे कमान सोपण्यात आली आहे. सध्या रशिया-युक्रेन या दोन्ही देशांत युद्ध सुरु झाले आहे. मात्र, हे युद्ध थांबवण्याबाबत व्लादिमीर पुतिन यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. युक्रेन-रशिया युद्धात भारताने मध्यस्थी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यात आता पुतीन यांच्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही युक्रेन युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे म्हटले आहे.

Web Title: Russia and india contract for pantsir air deffence system international marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • India Russia relations
  • Indian Air Force

संबंधित बातम्या

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
1

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
2

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Chetak-Cheetah Retire:चेतक आणि चीता निवृत्त होणार; सैन्यात 200 नव्या हेलिकॉप्टर्सची तैनात होणार
3

Chetak-Cheetah Retire:चेतक आणि चीता निवृत्त होणार; सैन्यात 200 नव्या हेलिकॉप्टर्सची तैनात होणार

Tariff war in India : डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफमधून दादागिरी; तरीही नाही झुकणार भारताची ‘इकोनॉमी’
4

Tariff war in India : डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफमधून दादागिरी; तरीही नाही झुकणार भारताची ‘इकोनॉमी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.