File Photo : Ajit Doval
नवी दिल्ली : युक्रेन-रशिया या दोन्ही देशांतील युद्ध अद्यापही सुरुच आहे. हे युद्ध लवकर थांबेल असे वाटत होते. मात्र, अजूनही या दोन्ही देशांत समझोता झाला नसल्याचे समोर आले आहे. असे असताना आता युक्रेन-रशिया युद्धात भारताने मध्यस्थी करावी, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच म्हटले होते. त्यानंतर आता भारतानेही मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्याकडे कमान सोपण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार १० नवीन ‘वंदे भारत ट्रेन’ची सुरूवात; ‘या’ राज्यांत धावणार
सध्या रशिया-युक्रेन या दोन्ही देशांत युद्ध सुरु झाले आहे. मात्र, हे युद्ध थांबवण्याबाबत व्लादिमीर पुतिन यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. युक्रेन-रशिया युद्धात भारताने मध्यस्थी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यात आता पुतीन यांच्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही युक्रेन युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे म्हटले आहे. त्यात अजित डोवाल हे पुढील आठवड्यात रशियाला जाणार आहेत. ऑक्टोबरमध्ये कझान येथे होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी ब्रिक्स एनएसए बैठकीत ते सहभागी होतील. यादरम्यान डोवाल रशिया-युक्रेन युद्ध सोडवण्यासाठी चर्चा करतील, असे म्हटले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांततेशी संबंधित चर्चा करण्यासाठी त्यांचे एनएसए रशियाला पाठवतील. या दौऱ्यात डोवाल आपल्या रशियन समकक्ष आणि ब्रिक्सच्या इतर सदस्य देशांच्या प्रतिनिधींना भेटतील. यामध्ये जुलैमध्ये मॉस्को शिखर परिषदेत झालेल्या चर्चेच्या आधारे पुढील रणनीती ठरवता येईल. सौदी अरेबिया, यूएई, इराण, इजिप्त आणि इथिओपिया हे नवीन पाच सदस्य देश या गटात सामील झाल्यानंतर प्रथमच ही ब्रिक्स एनएसए बैठक होत आहे.
भारत बजावू शकतो महत्त्वाची भूमिका
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताकडून ही अपेक्षा व्यक्त केल्यानंतर आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारत किवा चीन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे म्हटले आहे. मेलोनी यांनी इटालियन शहर चेरनोबिलमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली.
हेदेखील वाचा : विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाबाबत काहीही बोलू नका; भाजपकडून बृजभूषण सिंहला आदेश
भारतीय NSA BRICS मित्र राष्ट्रांशी चर्चा करणार
अजित डोवाल हे त्यांच्या रशियाच्या दौऱ्यात चीन आणि ब्राझीलसह त्यांच्या BRICS देशांसोबत भेट घेतील आणि गट संघर्ष संपवण्यासाठी पुढाकार कसा घेऊ शकेल यावर चर्चा करतील. राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मेलोनी या दोघांनीही भारत आणि चीनला संघर्ष निवारणासाठी भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे. रशिया आणि युक्रेनच्या नेत्यांशी पंतप्रधान मोदींचे जवळचे संबंध आहेत.