Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले; अमेरिकेने केला मदतीचा हात पुढे
नवी दिल्ली: सध्या इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्ध सुरू आहे. तसेच सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, रशियाने युक्रेनवर वेगवान हल्ले सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाच्या लष्करी सैन्याने बुधवारी रात्री युक्रेनवर 56 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले केले आहेत. रशियाच्या या हल्ल्यात रशियाने मायकोलायव्हच्या दक्षिण भागातील ऊर्जा प्रकल्पांना नष्ट केले आहे.
वीज पुरवठा खंडित
मायकोलायव्हचे प्रादेशिक गव्हर्नर विटाली किम यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या हल्ल्यामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच रशियाने केलेल्या या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. युक्रेनियन हवाई दलाने फ्रंट लाइनजवळील भागात पायाभूत सुविधांवर पाच क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
हे देखील वाचा- SCO शिखर परिषदेत भारताने मांडले ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे; जाणून घ्या मुख्य गोष्टी
रशियाचे 22 ड्रोन यशस्वीपणे रोखले
यावर युक्रेनच्या लष्करी सैन्याने म्हटले आहे की, आम्ही या हल्ल्यादरम्यान रशियाचे 22 रोखण्यात यशस्वी झालो आहोत. तर 27 ड्रोन अजून बेपत्ता आहेत. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी मीडियाला सांगितले की, ड्रोनचा मलबा राजधानीतील लहान मुलांच्या शाळेजवळ पडला. मात्र अद्याप महापौरांनी कीव आणि आसपासच्या भागात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची नोंद केली नाही.
अमेरिका मदतीसाठी पुढे
याचदरम्यान, रशियाच्या युकर्नेवरील हल्ल्यांनतर, अमेरिका पुन्हा एकदा युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कीवसाठी $425 दशलक्ष शस्त्रास्त्र पॅकेज पाठवली आहेत. या पॅकेजमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, चिलखती वाहने आणि इतर शस्त्रे यांचा समावेश आहे. याच वेळी, युक्रेनला रशियावर पाश्चात्य बनावटीची लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागण्याची परवानगी दिली जाईल की नाही याबद्दल कोणतीही माहिती प्रदान केलेली नाही.
2 वर्षापासून सुरू आहे युद्ध
गेल्या दोन वर्षापासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांवर अनेकदा हल्ले केले आहेत. पण आता रशिया ड्रॅगन ड्रोनचा वापर करत आहे. हे ड्रोन रशिया युद्धामध्ये पहिल्यांदाच वापरत आहे. हे रशियाचे आतापर्यंतचे सर्वात धोकादायक शस्त्र आहे. रशिया-युक्रेन युद्धात आता एक नवीन प्राणघातक शस्त्र आकाशात उडत आहे. हे ड्रोन वितळलेले धातू 2,427 अंश सेल्सिअस तापमानात जळत आहेत. या ड्रोनमधून थर्माईट नावाचा पदार्थ बाहेर पडतो जो ॲल्युमिनियम आणि लोह ऑक्साईडचे मिश्रण आहे. जे रेल्वे ट्रॅक वेल्ड करण्यासाठी शतकापूर्वी विकसित केले गेले होते.