रशियाने युक्रेनच्या ताब्यातील कुर्स्कची जमिनीच्या 40% भाग परत मिळवला; 59 हजार सैनिकही तैनात
मास्को: रशियाने युक्रनेच्या ताब्यातील कुर्स्कच्या जमिनीचा 40% भाग परत मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने रशियाच्या कुर्स्कचा मोठा प्रदेश चार महिन्यांपूर्वी काबीज केला होता. मात्र, रशियाने युक्रेनकडून आता आपला भाग परत हिसकावून घेतला आहे. अशी माहिती युक्रेनच्या जनरल स्टाफच्या अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्स्क प्रतांतील 1376 चौरस किमी जमीन ताब्यात ऑगस्टमध्ये ताब्यात घेतली होती.
यामुळे प्रत्युत्तरदाखल कारवाई रशियाने केली. रशियाने आता 800 चौरस किमी भाग परत मिळवला आहे. याशिवाय रशियाने कुर्स्कच्या भागामध्ये 59 हजार सैनिकही तैनात केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया या भागांतून सतत हल्ले करत आहे. मात्र, आम्ही राहिलेल्या परिसर त्यांनी परत मिळू देणार नाही.
रशियाने युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला केला
अमेरिकेचे अध्याक्ष डो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली होती. यानंतर संतप्त झालेल्या रशियाने देखील या क्षेपणास्त्रांच्या विरोधात आण्विक शस्त्रे वारण्याचा निर्णय घेतला होता. युक्रनेन या निर्णयाच्या दुसऱ्या दिवशीच रशियाच्या ब्रायन्स्क भागातं अमेरिका निर्मित लांब पल्ल्यांची ATACMS क्षेपणास्त्रे डागली. मात्र, रशियाने यातील पाच क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
या हल्लयाच्या सलग दुसऱ्या दिवशी युक्रेन पुन्हा एकदा रशियाच्या कुर्स्क भागामध्ये ब्रिटनच्या ‘स्टॉर्म शॅडो क्रूझ’ क्षेपणास्त्राने जोरदार हल्ले केले. यामुळे या हल्ल्यांचे प्रतयुत्तर दाखल संतप्त रशियाने युक्रेनच्या डनिप्रो शहरावर मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र डागली. रशियाने या नवीन इंटरमीडिएट रेंडच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी युक्रेनवर केली. तसेच पुतिन यांनी या क्षेपमास्त्रांचे उत्पादन करण्याचे आदेश दिले. रशियाने युक्रेनला मदत करणाऱ्या नाटोला देखील कारवाईचा उशारा दिली आहे.
रशियाने उत्तर कोरियाचे सैन्य तैनात केले
युक्रनेच्या जनरल स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने कुर्स्कमध्ये सुमारे 11 हजार उत्तर कौरियाचे जवान तैनात केले आहे. यापैकी बहुतांश जवानांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. मात्र, युक्रेनच्या या दाव्यावर रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. युक्रनेच्या जनरल स्टाफच्या म्हणण्यानुसार, सध्या युक्रेनमध्ये 5.75 लाख रशियन सैनिक तैनात असून रशिया ही संख्या वाढवण्याची शक्यता आहे.
याशिवाय, रशियन सैन्य युक्रेनच्या डोनेस्तक भागांमध्ये भूदली पुठे जात आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने डोनेस्तकमधील संरक्षण रेषा ओलांडली आहे. तसेच रशियन सैन्य रोज डोनेस्तकच्या कुर्खोव्ये भागामध्ये 200 ते 300 मीटर पुढे जात आहे. युक्रेनच्या पोकरोव्स्क लॉजिस्टिक सेंटरपर्यंत पोहोचण्यासाठी हे क्षेत्र रशियाने महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.