Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तैवानचा वापर करून अमेरिका आशियामध्ये निर्माण करणार मोठे संकट; रशियाचा गंभीर आरोप

रशियाने अमेरिकेवर मोठा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने म्हटले आहे की, अमेरिका तैवानचा वापर करुन आशिया भागांत गंभीर संकट निर्माण करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 24, 2024 | 02:52 PM
तैवानचा वापर करून अमेरिका आशियामध्ये निर्माण करणार मोठे संकट; रशियाचा गंभीर आरोप

तैवानचा वापर करून अमेरिका आशियामध्ये निर्माण करणार मोठे संकट; रशियाचा गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

मास्को: रशियाने अमेरिकेवर मोठा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने म्हटले आहे की, अमेरिका तैवानचा वापर करुन आशिया भागांत गंभीर संकट निर्माण करत आहे. हा गंभीर आरोप रशियाचे उप परराष्ट्रमंत्री आंद्रेई रुडेन्को यांनी केला आहे. तैवानच्या मुद्द्यावर चीनच्या रुखाला रशियाने पुन्हा एकदा समर्थन दिले असून, अमेरिकेच्या धोरणांवर कठोर टीका केली आहे. अमेरिका तैवानला औपचारिकपणे मदत न करता सैन्य पुरवत असल्याचे रशियाने म्हटले आहे.

अमेरिका चिन-तैवान मुद्याचा वापर करत आहे

रुडेंको यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “चीन तैवानवर आपल्या एकाच सिद्धांतावर विश्वास ठेवतो, पण अमेरिका त्याला वारंवार नाकारत आहे. तसेच अमेरिका या मुद्द्याच्या माध्यमातून तैवानला सैन्याचे सुसज्ज करणारी मदत देत आहे. यामुळे तैवानसोबत सैन्य-राजकीय संबंध अधिक दृढ होतात.” रशियाचे म्हणण्यानुसार, अमेरिका आशियाई क्षेत्रांतील घटनांमध्ये हस्तक्षेप करत आहे. यामुळे पीआरसीच्या सहिष्णुतेला धक्का बसला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- COP-29 Summit: भारताने अमेरिकेचा अब्ज डॉलर्सचा जलवायु वित्त करार नाकारला; ग्लोबल साउथ देशांच्या नेतृत्वात म्हणाला…

तैवान चिनचाच एक भाग आहे

चिनी सरकार तैवानला आपला एक भाग मानतो. मात्र, तैवानच्या सरकारने हा दावा खोडला आहे. या मुद्द्यावर अमेरिका तैवानसोबत औपचारिकपणे कोणतेही राजकीय संबंध ठेवत नाही. मात्र, याबाबत त्यांचे समर्थन अत्यंत ठळक आहे. अमेरिका तैवानला सैन्य मदत पुरवत आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

तैवानला 567 मिलियन डॉलरची सैन्य सहाय्यता

मीडिया रिपोर्टनुसार, याआधी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तैवानला 567 मिलियन डॉलरची सैन्य सहाय्यता मंजूर केली होती. रशियाचे म्हणणे आहे की, अमेरिकेने तैवानच्या बाबतीत आणखी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. अमेरिकेचे हे धोरण आशियामध्ये अधिक अस्थिरता निर्माण करण्यासाठी केले जात आहे. अमेरिकेच्या या प्रकारच्या वागणुकीमुळे आशियाई क्षेत्रीय शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा रशियाने केला आहे.

अमेरिकेच्या धोरणांमुळे आशियामध्ये संकटे निर्माण

फेब्रुवारी 2022 मध्ये, यूक्रेनवरील आक्रमणादरम्यान, चीन आणि रशिया यांच्यात ‘कोणत्याही सीमाशर्ती न ठेवणारा’ भागीदारी करार झाला होता. त्यानंतरच्या महिन्यांमध्ये, मे 2023 मध्ये, रशिया आणि चीन यांनी एक “नवीन युग” सुरू होईल, असे जाहीर केले होते. या सहकार्यामुळे अमेरिकेने शीतयुद्धाच्या नव्या वादाच्या शक्यतेला हवा दिली आहे. रशिया आणि चीन एकमेकांशी सहकार्य करत असताना, अमेरिकेच्या धोरणांमुळे आशियामध्ये आणखी संकटे निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी चिंता अनेक देशांमध्ये व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जॉर्डनमध्ये इस्त्रायल दूतावासावर गोळीबार; प्रत्युत्तरात हल्लेखोर ठार, 3 पोलिस कर्मचारी जखमी

Web Title: Russia says us using taiwan to stri crisis in asia nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • America
  • China
  • Russia
  • world

संबंधित बातम्या

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
1

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
2

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
3

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत
4

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.