Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शक्तिशाली भूकंपाने हादरला रशिया; 8.7 तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा

रशियात मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 8.7 इतकी मोजण्यात आली. जपानच्या सुदूर पूर्व कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर हा भूकंप झाला. या भूकंपाने पॅसिफिक प्रदेशात खळबळ उडाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2025 | 09:17 AM
रशियात 8.7 तीव्रतेचा मोठा भूंकप; जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा

रशियात 8.7 तीव्रतेचा मोठा भूंकप; जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विविध देशांत तसेच भारतातील काही राज्यांतही भूकंप झाल्याचे पाहिला मिळत आहे. त्यातच आता रशियात मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 8.7 इतकी मोजण्यात आली. जपानच्या सुदूर पूर्व कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर हा भूकंप झाला. या भूकंपाने पॅसिफिक प्रदेशात खळबळ उडाली.

रशियात झालेला हा भूकंप इतका शक्तिशाली होता की, अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. अमेरिका, जपान, न्यूझीलंड, फिलीपिन्स, इक्वेडोर आणि हवाई सारख्या भागातील समुद्रकिनाऱ्यांवर धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, तेथील यंत्रणाही अलर्ट झाली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, १९५२ नंतरचा हा या प्रदेशातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. कमचटका किनाऱ्यावर किमान सहा भूकंप नोंदवले गेले, ज्यांची तीव्रता ५.४ ते ६.९ पर्यंत होती. मात्र, हे सर्व भूंकप ८.७ रिश्टर स्केलच्या भूकंपापेक्षा कमी शक्तिशाली होते.

पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने इशारा दिला आहे की, रशिया आणि इक्वेडोरच्या काही किनारी भागात ३ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळू शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी X वर पोस्ट केले की, ‘पॅसिफिक महासागरात झालेल्या मोठ्या भूकंपामुळे, किनारपट्टीवर राहणाऱ्यांसाटी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. अलास्का आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावर त्सुनामीचे निरीक्षण सुरू आहे. जपान देखील धोक्यात आहे. खंबीर राहा आणि सुरक्षित राहा’.

त्सुनामीच्या भीतीत अनेक देश

हवाईमध्ये त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर, होनोलुलुमध्ये सायरन वाजवण्यात आले आणि लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. 1 ते 3 मीटर उंच लाटा हवाई, चिली, जपान आणि सोलोमन बेटांवर येऊ शकतात. जपानने टोकियो खाडीसह अनेक भागात त्सुनामीचा इशारा देखील जारी केला आहे. न्यूझीलंडमधील आपत्ती व्यवस्थापन संस्थेने किनारी भागात असामान्य आणि तीव्र प्रवाह येण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Russia shaken by powerful earthquake 8 7 magnitude earthquake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • Earthquake
  • Earthquake in Russia
  • Natural Disaster
  • Russia Earthquake

संबंधित बातम्या

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
1

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच
2

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

Philippines Earthquake : वादळातून सावरता सावरता बसला तीव्र भूंकपाचा धक्का; फिलिपिन्समध्ये प्रचंड विध्वंस अन् मृत्यूचा तांडव
3

Philippines Earthquake : वादळातून सावरता सावरता बसला तीव्र भूंकपाचा धक्का; फिलिपिन्समध्ये प्रचंड विध्वंस अन् मृत्यूचा तांडव

Geology News : पृथ्वीसाठी नव्या संकटाची चाहूल; 9 महिन्यांत 28,000 हून अधिक भूकंपांमागे एक मोठं कारण
4

Geology News : पृथ्वीसाठी नव्या संकटाची चाहूल; 9 महिन्यांत 28,000 हून अधिक भूकंपांमागे एक मोठं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.