Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine युद्धात पहिल्यांदाच सुखद बातमी! 32 तासांसाठी युद्धविराम जाहीर; पुतिन आणि झेलेन्स्की एकाच निर्णयावर ठाम

Russia Ukraine War : क्रेमलिनने सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी इस्टरच्या सुट्टीनिमित्त, ११ एप्रिल ते १२ एप्रिलच्या अखेरपर्यंत युद्धविरामाची घोषणा केली. युक्रेनने या युद्धविरामाला दुजोरा दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 10, 2026 | 04:26 PM
russia ukraine easter ceasefire putin zelenskyy agreement 32 hours truce 2026

russia ukraine easter ceasefire putin zelenskyy agreement 32 hours truce 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पुतिन यांचा मोठा निर्णय
  • युक्रेनची सहमती
  • युद्धाच्या सावलीत इस्टर

Russia Ukraine Ceasefire Easter 2026 : जगभरात जेव्हा अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने तणाव निर्माण झाला आहे, तेव्हा रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine war) या दोन पारंपरिक शत्रूंनी घेतलेला एक निर्णय सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऑर्थोडॉक्स इस्टरच्या पवित्र सुट्टीनिमित्त युक्रेनसोबत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. ११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेपासून ते १२ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत ही शस्त्रसंधी लागू राहणार आहे. रशियाच्या या प्रस्तावाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, युक्रेनही या काळात कोणतीही लष्करी कारवाई करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

क्रेमलिनकडून ‘डेडलाईन’ जाहीर

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय असलेल्या क्रेमलिनने गुरुवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. निवेदनानुसार, रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव्ह यांनी सरसेनापती वॅलेरी गेरासिमोव्ह यांना लष्करी कारवाया थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. रशियाने म्हटले आहे की, इस्टर हा सण दोन्ही देशांमधील नागरिकांसाठी धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे, त्यामुळे लोकांनी कोणत्याही भीतीशिवाय प्रार्थना करावी या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. मात्र, रशियाने असा इशाराही दिला आहे की, जर युक्रेनकडून या काळात कोणताही हल्ला झाला, तर रशियन सैन्य सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज असेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran No Talks : इस्लामाबाद किल्ल्यासारखं सजवलं, पण पाहुणेच गायब; इराणचा शांतता चर्चेला सणसणीत नकार, त्यात पाकिस्तानचा अपमान

झेलेन्स्की यांचा प्रतिसाद आणि सद्यस्थिती

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी टेलिग्रामवर पोस्ट करत सांगितले की, युक्रेनने यापूर्वीही अशा शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला होता. “लोकांना शांततेने इस्टर साजरा करण्याची संधी मिळाली पाहिजे. रशियाकडे ही सुवर्णसंधी आहे की त्यांनी इस्टरनंतरही हे हल्ले पुन्हा सुरू करू नयेत,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, २४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या या युद्धात दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले असून हजारो सैनिकांनी प्राण गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर ३२ तासांची ही शांती दोन्ही देशांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

BREAKING: Putin announced an Easter ceasefire between Russia and Ukraine According to the Kremlin, the ceasefire will last from 16:00 on April 11 until the end of the day on April 12, 2026. pic.twitter.com/lrwi9hxNQp — Visegrád 24 (@visegrad24) April 9, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MQ4C Triton : अमेरिकेचा 1600 कोटींचा ‘ट्रायटन’ हवेतच गायब; आखातात रोज 3 हजार कोटींचा धूर, रहस्यमय ‘सिग्नल’ने खळबळ

हल्ल्यांचे सत्र आणि संशयाचे वातावरण

युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी, प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. या घोषणेनंतर काही तासांतच डनिप्रोपेत्रोव्स्क प्रदेशात रशियन तोफखाना आणि ड्रोन हल्ल्यात दोन नागरिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीही अशाच प्रकारचा अल्पकालीन युद्धविराम जाहीर करण्यात आला होता, मात्र दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप केला होता. त्यामुळे यंदाचा हा इस्टर खरोखरच शांततेत पार पडणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या दरम्यान ही बातमी आल्याने जागतिक राजकारणात सकारात्मक वारे वाहू लागले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशिया-युक्रेन युद्धविराम कधीपासून सुरू होणार आहे?

    Ans: हा युद्धविराम ११ एप्रिल २०२६ रोजी मॉस्को वेळेनुसार दुपारी ४ वाजता सुरू होईल आणि १२ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत चालेल.

  • Que: हा युद्धविराम का जाहीर करण्यात आला आहे?

    Ans: ऑर्थोडॉक्स इस्टर (Orthodox Easter) या पवित्र सणानिमित्त नागरिकांना शांततेत प्रार्थना करता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.

  • Que: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची यावर काय भूमिका आहे?

    Ans: झेलेन्स्की यांनी या युद्धविरामाला दुजोरा दिला असून युक्रेन त्याचे पालन करेल आणि शस्त्रसंधी मोडणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

Web Title: Russia ukraine easter ceasefire putin zelenskyy agreement 32 hours truce 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Ceasefire
  • Russia and Ukraine war
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky

संबंधित बातम्या

RIC Group: अमेरिकेची राजवट धोक्यात! पुतिन यांच्या गुरूची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? ‘हे’ तीन देश एकत्र येऊन बदलणार सत्ताकारण
1

RIC Group: अमेरिकेची राजवट धोक्यात! पुतिन यांच्या गुरूची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? ‘हे’ तीन देश एकत्र येऊन बदलणार सत्ताकारण

Putin-Jinping Meet : Trump यांच्या दौऱ्यानंतर पुतिन-जिनपिंगची चीनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; बीजिंगमध्ये नेमकं काय शिजतंय?  
2

Putin-Jinping Meet : Trump यांच्या दौऱ्यानंतर पुतिन-जिनपिंगची चीनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; बीजिंगमध्ये नेमकं काय शिजतंय?  

BRICS Summit 2026: ग्लोबल पॉवर प्ले! दिल्लीत भरणार महासत्तांचा दरबार; पुतिन-जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष
3

BRICS Summit 2026: ग्लोबल पॉवर प्ले! दिल्लीत भरणार महासत्तांचा दरबार; पुतिन-जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.