Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धास नवे वळण; शांततेसाठी झेलेन्स्की युद्धविराम करण्यास सहमत

रशिया-युक्रेन युद्ध गेल्या दीड वर्षापासून पेटले होते. दोन्ही देशांमध्ये सत्त हल्ले सुरू होते. मात्र आता युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या एका वक्तव्याने या युद्धाला नवे वळण घेणे आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 01, 2024 | 12:08 PM
Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धास नवे वळण; शांततेसाठी झेलेन्स्की युद्धविराम करण्यास सहमत

Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धास नवे वळण; शांततेसाठी झेलेन्स्की युद्धविराम करण्यास सहमत

Follow Us
Follow Us:

कीव: रशिया-युक्रेन युद्ध गेल्या दीड वर्षापासून पेटले होते. दोन्ही देशांमध्ये सत्त हल्ले सुरू होते. मात्र आता युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या एका वक्तव्याने या युद्धाला नवे वळण दिले आहे. यामुळे जगभरातील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अडीच वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या प्राणघातक संघर्षामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शांततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी रशियाला युक्रेनचा भूभाग देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.

युद्धविरामासाठी रशियाला युक्रेनची अट मान्य करावी लागणार

मीडिया रिपोर्टनुसार, व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शांततेसाठी रशियाला युक्रेनियन प्रदेश देण्याचे मान्य केले आहे, मात्र यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. त्यांच्या मते, हा भूभाग तात्पुरता नाटोच्या संरक्षणाखाली राहणार आहे. झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे की, युद्धविरामानंतर नाटोच्या मदतीने राजनयिक मार्गाने हा प्रदेश परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यांचा हा निर्णय युक्रेनच्या राजकीय धोरणामध्ये मोठा बदल घडवून आणू शकतो असे म्हटले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युद्धविराम करारानंतर हिजबुल्लाह प्रमुखाचा इस्त्रायला पराभूत केल्याचा दावा म्हणाला…

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी युक्रेन सरकारने आपली आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सीमा परत मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका घेतली होती. यामध्ये 2014 मध्ये रशियाने जप्त केलेला क्राइमिया तसेच 2022 मध्ये ताब्यात घेतलेले चार इतर प्रदेश सामील आहेत. मात्र, झेलेन्स्की यांनी पहिल्यांदाच शांततेसाठी भूभाग सोडण्याची तयारी व्यक्त केली आहे. पण रशियाला युक्रेनची अट मान्य करावी लागेल. यामुळे यावर रशिया आता काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

काही भाग नाटोच्या संरक्षणाखाली

व्लादिमिर झेलेन्स्कीर यांनी म्हटले आहे की, “जर युद्ध थांबवायचे असेल शांतता प्रस्थापित करयची तर कठोर निर्णय घ्यावे लागतील.” तसेच त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, ” युक्रेनचा काही भाग नाटोकडे त्याच्या संरक्षणाखाली राहिल. रशियाला हा भाग तात्परुरत्या स्वरुपात देण्यात येईल. हा मार्ग युद्ध थांबविण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे. झेलेन्स्की यांच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जगभरातील लोकांचे लक्ष रशिया-युक्रेनकडे

काही तज्ञांच्या मते, हा निर्णय युक्रेनसाठी एक धोरणात्मक पाऊल आहे, ज्यामुळे युद्ध थांबून पुढील वाटाघाटींसाठी मार्ग खुला होईल. तर काहींच्या मते, हा निर्णय युक्रेनच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणारा आहे. जगभरातील देश या स्थितीकडे बारकाईने पाहत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध थांबण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र, याचे दीर्घकालीन परिणाम काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायल नेतन्याहू-गॅलेंटच्या अटकेवर आंतरराष्ट्रीय न्यालयाकडे करणार अपील; आरोप निराधार असल्याचा दावा

Web Title: Russia ukraine war news twist zelensky ready to ceasefire nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी
1

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
2

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
4

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.