फोटो सौजन्य: सोशल मीडिया
Israel-Hezbollah War: इस्त्रायल-हिजबुल्ल्हा युद्धविरामनंतर तीन दिवसांनी नईम कासिम यांचे धक्कदायक वक्तव्य समोर आले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटनेचे प्रमुख नईम कासिम यांनी इस्रायलविरुद्धच्या संघर्षात विजयाचा दावा केला आहे. युद्धविरामानंतर त्यांनी जनतेला संबोधित करत म्हटले आहे की, हिजबुल्लाने 2006 च्या युद्धापेक्षा मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्या मते, इस्रायलने हिजबुल्लाला संपवण्याचा प्रयत्न केला,मात्र ते अपयशी ठरले आहेत.
हिजबुल्लाहने इस्त्रायलला पराभूत करत युद्धविराम घडवून आणला
हिजबुल्लाह प्रमुख नईम कासिम यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही इस्रायलला गुडघ्यावर आणले आणि युद्धविरामासाठी तडजोड करायला भाग पाडले आहे.’ कासिम यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या पेजर हल्ल्याचा संदर्भ देत सांगितले की, इस्रायलने हिजबुल्लाच्या नेतृत्वावर हल्ला करून संघटनेला संपवण्याचा प्रयत्न केला, पण हिजबुल्लाने याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या होम फ्रंटवर जोरदार हल्ले करत त्यांनी इस्रायलला बचावात्मक भूमिकेत ढकलले आणि अखेरीस युद्धविराम घडवून आणला.
इसत्रायल-हिजबुल्लाह करार ऐतिहासिक
युद्धविरामानंतर हिजबुल्ला आणि लेबनीज सैन्य एकत्र काम करत असल्याचे कासिम यांनी सांगितले. त्यांनी या कराराला ऐतिहासिक मानले असून लितानी नदीच्या दक्षिणेकडील भागातून इस्रायली सैन्याची माघार हा त्याचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले. युद्धविरामासाठी अमेरिका आणि फ्रान्सने मध्यस्थी केली. करारानुसार, इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमधून माघार घेईल, तर हिजबुल्लाही आपले सैन्य मागे घेईल.
नेतन्यांहूंनी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला
मात्र, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या युद्धबंदीत तीन महत्त्वाचे मुद्दे मांडलेआहेत. नेतन्याहूंनी म्हटले आहे की, इराणवर लक्ष केंद्रित करणे, थकलेल्या राखीव सैनिकांना विश्रांती देणे आणि हमासला अलग करणे. या युद्धामुळे दक्षिण लेबनॉनमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागले. युद्धविरामानंतर हजारो लोक उत्तरेकडील भागात परतण्यास सुरुवात करत आहेत. मात्र, इस्रायली सैन्याने अजूनही काही गावांतील नागरिकांना परतण्याचा इशारा दिला आहे.
इस्रायलने हिजबुल्लाचे काही वरिष्ठ नेते, हसन नसरल्लाह आणि हाशिम सैफुद्दीन यांचा समावेश आहे, यांना लक्ष्य केले आहे. नसरल्लाहचा मृत्यू आणि हिजबुल्लाचे इतर नेते मारल्याने संघटनेला मोठा फटका बसल्याचे इस्रायलने सांगितले आहे.
मध्यपूर्वेतील शांततेचे भविष्य
इस्रायल-हिजबुल्लाहच्या पुन्हा एकदा वाढत्या संघर्षाने मध्यपूर्वेत अस्थिरतेचा धोका वाढवला आहे. युद्धविराम तात्पुरता असला, तरी या प्रदेशात दीर्घकालीन शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समुदाय या क्षेत्रात शांती प्रस्थापित करण्यासाठी जागतिक सत्रावरक चर्चा करत आहेत. नेतन्याहू यांच्या नेतृत्त्वाखाली इस्रायलच्या उजव्या विचारसरणीने युद्धविरामाच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या संघर्षाचा अंत कधी आणि कसा होईल, हे सांगणे कठीण आहे. युद्धविरामाचे उल्लंघन झाल्याने हिंसाचार आणखी भडकला असल्याचे नाकारता येत नाही.