Russia Ukraine War Putin hints at direct talks with Zelensky on Russia's conditions
Russia Ukraine News in Marathi : कीव/मॉस्को : रशिया आणि युक्रेन युद्धाने (Russia Ukraine War) सध्या भयकंर रुप धारण केले आहे. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ हे युद्ध सुरु आहे. रशिया सतत युक्रेनवर हल्ला करत आहे. एकीकडे शांतता चर्चांचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र युद्ध थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी शांततेने चर्चेचे संकेत दिले आहे. यामुळे युद्ध थांबवण्याची शक्यता असल्याची आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला शांततेने आणि संतुलनाने चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहे, पण गरज पडल्यास मॉस्को युद्ध बळजबरीने संपवेल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. पुतिन यांचे हे विधान अशा वेळी आहे जेव्हा रशिया आणि चीनमध्ये गॅस पाइपलाइन करारावर स्वाक्षरी झाली आहे.
ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुर्दैवी घटना; गणेश विसर्जन करून परतताना भीषण अपघात
पुतिन यांनी पत्रकारांशी चर्चा करताना म्हटले आहे की, जर युक्रेनने शहाणपणे आणि संतुलन ठेवून संघर्ष संपवण्यासाठी तोडगा काढला, तर आम्हीही त्यावर सहमत होऊ. पण असे न झाल्यास मॉस्को जबरदस्तीने युद्ध संपवण्यासाठी तयार आहे. याच वेळी पुतिन यांनी युद्ध संपवण्यासाठी ठेवल्याला अटींचे पुन्हा पुनरुच्चारण केले आहे.
पुतिन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी समोरा-समोर चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. पण चर्चा रशियाच्या अटींवर आणि शांततेने व्हाावी असे त्यांनी म्हटले आहे. मात्र कीवने रशियाचा हा प्रस्ताव नाकारला आहे. मॉस्कोमध्ये बैठकीचे प्रस्तावाला युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांना नकार दिला आहे. तर झेलेनस्की यांनी अमेरिकेला आणि युरोपीय देशांना रशियावर कडक निर्बंध लादण्याची मागणी केली आहे.
आतापर्यंतच्या अनेक चर्चा अयशस्वी झाल्या आहेत. यावेळी देखील चर्चा अपयशी ठरल्यास रशियावर निर्बंध लादले जाऊ शकतात. मात्र पुतिन यांनी यावेळी शांततेने युद्ध संपवू इच्छित असल्याचे म्हटले आहे. मात्र रशिया अटींपासून मागे हटणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्पच्या उलट्या बोंबा! म्हणाले; भारत सगळ्यात जास्त टॅरीफ लावणारा देश, म्हणूनच आम्हीही…