
Vladimir Putin annd Jeffrey Epstein Relation
Epstein Files मुळे जागतिक राजकारणात भूकंप; अमेरिकेपासून ते नॉर्वेपर्यंत राजीनाम्यांची लाट
कागदपत्रांनुसार, एपस्टीने रशियाच्या न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रातील तत्कालीन रशियन राजदूत विटाली चूरकिन यांच्याशी मैत्री वाढवली होती. २००६ ते २०१७ दरम्यान रशिया संयुक्त राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्य होता. या काळातच एपस्टीनने रशियन राजदूताची सतत भेट घेतली होती. त्यांच्याशी संवाद साधला होता. परंतु २०१७ मध्ये विटाली यांचे अचानक निधन झाले.
यानंतर एपस्टीनने २०१८ मध्ये रशियाशी पुन्हा संपर्क साधला. यासाठी त्याने रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यामार्फत रशियाच्या सत्तेत घुसखोरी करण्याचे ठरवले. त्याने नॉर्वेचे माजी पंतप्रधान थॉर्बजॉर्न यांगलँड यांच्या संपर्क केला होता. थॉर्बजॉर्न यांनी सर्गेई लाव्हरोव्ह यांच्याशी त्याच्याबद्दल बोलण्याचे सुचवले होते. यासाठी त्याने रशियाच्या राजकारणात आणि देशात गुंतवणूक करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यास सांगितला होता. रशियाला मदत करु शकणार एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून जेफ्रीने स्वत:ला सादर केले होते.
दस्ताऐवजांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, एपस्टीनने इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद बराक यांना थायलंडचे माजी पंतप्रधान यागलँड पुतिन यांना भेटणार आहेत आणि एपस्टीन त्यांना भेटू शकतो का असा विचारले होते. यासाठी एपस्टीनने पाश्चात्य देशांकडून रशियामध्ये मोठ्या गुंतवणूकीला आकर्षित करण्याचा सल्ला देऊ शकतात असे म्हटले होते. यासाठी त्याने दोन तीन दिवसांची मुदत त्याने मागितली होती.
आणखी एका ईमेलनुसार, एपस्टीन पुराव्याशिवाय दावा करण्यात आला आहे की, सेंट पीटर्बर्ग येथे आर्थिक परिषदेत पुतिन यांची भेट घेण्याची विनंती त्याने केली होती. पण पुतिन यांनी ही विनंती नाकारली होती. या बैठकीबाबत कोणतेही पुरावे देखील आढळलेले नाहीत. सध्या जेफ्री एपस्टिनच्या रशियाशी संबंधावर पोलंडमध्ये चौकशी सुरु आहे. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी यावर संभाव्य गुप्तचर ऑपरेशन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. परंतु त्यांनी रशियाच्या एपस्टिनच्या रशियन गुप्तचर संस्था, किंवा पुतिन यांच्या असलेला संबंधाना नाकराला आहे.