रशिया-युक्रेन युद्ध संपणार? युद्धबंदीसाठी जर्मन चान्सलर स्कॉल्झ यांचे पुतिन यांना आवाहन म्हणाले...
बर्लिन: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून युद्ध सुरू आहे. याच वेळी जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कॉल्झ यांनी फोन करून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या फोनवर चर्चा केली. त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आवाहन केले. सुमारे दोन वर्षानंतर ओलाफ स्कॉल्झ आणि पुतिन यांच्यामध्ये संबाद झाला. तासभर चाललेल्या या संवादारम्यान स्कोल्झ यांनी रसियाला युक्रेनमधून सैन्य माघारी घेण्यास सांगितले. आणि युक्रेनला जर्मनची सतत समर्थनाची पुष्टी केली.
रशियाचा प्रस्ताव आणि स्कॉल्झ यांचे मतभेद
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या चर्चेत जर्मनीला ऊर्जा कराराचा प्रस्ताव दिला त्यांनी स्कॉल्झ यांना सांगितले की, युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियन सुरक्षा हितांचा विचार व्हावा. तसेच, नवीन प्रादेशिक वास्तवांना मान्यता द्यावी, असे ते म्हणाले. मात्र, स्कॉल्झ यांनी युक्रेनमधील उत्तर कोरियाच्या सैन्य तैनातीस तीव्र विरोध केला आणि हा गंभीर प्रश्न असल्याचे नमूद केले. यामुळे संघर्षाचा विस्तार होईल असे स्कॉल्झ यांनी स्पष्ट केले.
जर्मनी युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवणारा दुसरा मोठा भागीदार
युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनी हा युक्रेनचा सर्वात मोठा आर्थिक सहाय्यक ठरला आहे. अमेरिकेनंतर युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवणारा जर्मनी हा दुसरा मोठा देश आहे. स्कोल्झ यांनी न्याय्य आणि चिरस्थायी शांतता साधण्यासाठी रशियाला वाटाघाटींसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्याच वेळी स्कॉल्झ यांनी युक्रेनमधील संघर्ष जर्मनीसाठी आर्थिक आणीबाणी असल्याचेही म्हटले. युद्धाचा कालावधी किती वाढेल, याबद्दलची अनिश्चितता जर्मनीच्या अर्थव्यवस्थेवर ताण आणत आहे. त्यांनी कर्जाच्या नियमांमध्ये बदरल करण्याचे आवाहन केले. स्कॉल्झ म्हणाले की, तेव्हा घेतलेला चुकीचा निर्णय आज आपण बदलू शकत नाही.
झेलेन्स्की यांचा विरोध
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राअध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी स्कॉल्झ यांना पुतिन यांच्याशी चर्चा करण्याविरुद्ध चेतावणी दिली. पुतिन यांना खरी शांतता नको असून केवळ वेळकाढूपणा हवा आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले. त्यांनी असा दावा केला की पुतिन यांच्याशी चर्चा केल्याने युद्ध आणखी लांबणीवर जाईल आणि त्यांना नवी रणनीती आखण्यासाठी वेळ मिळेल. यामुळे रशियाला याचा फायदा होईल.
युक्रेनच्या ओडेशा शहरावर रशियाचा हवाई हल्ला
याशिवाय, रशियाने युक्रेनच्या ओडेशा बंदर शहरावर हवाई केला असून, या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे 40 हजारांहून अधिक नागरिक थंडीत गरम प्रणाली बंद पडल्याने अडचणीत सापडले आहेत. प्रसूती रुग्णालयालाही याचा फटका बसला आहे.