फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नायजेरिला भेट देणार आहेत. ही भेट गेल्या 17 वर्षातमध्ये भारतीय पंतप्रधानांची पहिलीच भेट असेल. याआधी 2007ला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नायजेरियाला भेट दिली होती. त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांची ही भेट नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून होत आहे. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष टिनुबू यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. या भेटीत ऊर्जा, व्यापार, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण आणि खाणकाम यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाईल. यानंतर पंतप्रधान भारतीय समुदायाला अबुजामध्ये संबोधित करतील.
नायजेरिया भारतासाठी महत्त्वाचे का आहे?
नायजेरिया तेल आणि वायूच्या प्रचंड साठ्यांमुळे भारतासाठी महत्त्वाचा देश आहे. नायजेरिया भारताच्या ऊर्जेच्या गरजा भागवतो. ऊर्जा आणि खनिजस्रोतांसोबत भारताच्या आफ्रिकेतील गुंतवणुकीसाठी नायजेरिया एक प्रमुख केंद्र आहे. नायजेरियाच्या स्वातंत्र्यानंतर भारताने आफ्रिकन देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्थन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध सुरू स्वातंत्र्यापूर्वीच दृढ झाले होते. 1962 मध्ये पंडित जवाहरलाला यांच्या भेटीनंतर भारत-नायजेरिया संबंधाचा पाया अधिक दृढ रचला गेला.
भारताचे नायजेरियासोबतचे संबंध 1958 पासून सुरू झाले आहेत. 1960 मध्ये नायजेरियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संबंध अधिक दृढ झाले. नायजेरिया ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज (OIC) आणि ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चा सदस्य असल्याने जागतिक स्तरावरही महत्त्वाचा आहे. भारत आणि नायजेरिया हे दोन्ही लोकशाही देश असल्याने दोघांमध्ये सहकार्याचे ऐतिहासिक संबंध आहेत.
नायजेरियाची लोकसंख्या 23 कोटी असून, 2050 पर्यंत लोकसंख्येत वाढ होऊन 40 कोटी होईल, असा अंदाज आहे. हा देश आर्थिक प्रगती करीत असून, उत्तरेकडील मुस्लिमबहुल भागात गरीबी अधिक आहे, तर ख्रिश्चनबहुल दक्षिण आणि पूर्व भाग तुलनेने अधिक समृद्ध आहेत. या सामाजिक आणि धार्मिक विविधतेमुळे देशात काही वेळा वाद निर्माण होतात.
17 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नायजेरियाला भेट देणार आहेत. ही भेट 17 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची पहिली भेट असेल. राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. यादरम्यान दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी वाढविण्यावर चर्चा होणार आहे. भारत आणि नायजेरियामध्ये 2007 पासून धोरणात्मक भागीदारी आहे. यामध्ये ऊर्जा, आर्थिक आणि संरक्षण सहकार्याचा समावेश आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करतील. यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील. ही भेट भारताच्या जागतिक धोरणांसाठी महत्त्वाची आहे.