Russia wreaks havoc in Ukraine! Drones and missiles rained down on many parts of Kiyv overnight
कीव : गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. रशिया गेल्या काही दिवांपासून सातत्याने युक्रनेवर हल्ले करत आहे. बुधवारी (9 जुलै) पहाटेच्या वेळी रशियाने युक्रेनच्या अनेक भागांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. हा आतापर्यंत रशियाचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. रशियाने एका रात्रीत 728 ड्रोन युक्रेनच्या शहरांवर डागले आहे.
युक्रेनियन सैन्याने हवाई संरक्षण प्रणालीच्या मजतीने रशियाचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने पश्चिमी भागातल शहरांना लक्ष्य केले.यामध्ये लुत्स्क, ल्विव्ह, खमेलनित्स्की आणि टेर्नोपिल या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. सर्वात जास्त हल्ले रशियाने लुत्स्क शहरावर केले असल्याचे युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे.
युक्रेनन यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात रशियाने एका रात्रीत ७२८ शाहिद आणि डिकॉय ड्रोन डागले असल्याचे म्हटले आहे. तसेच १३ क्षेपणास्त्रांचा मारा रशियाने युक्रेनवर कतेला आहे. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, रशियाने पोलंड आणि बेलारुसच्या सीमेवर पश्चिम व्होलिन प्रदेशाला आणि लुत्स्कला लक्ष्य केले असल्याचे म्हटले आहे.
रशियाने लुत्स्कमध्ये एका हवाई तळावर हल्ला केला आहे. या हवाई तळावरन मालवाहू विमाने आणि लढाऊ विमानांचे उड्डाण करण्यात येते. रशियाने या एअरबेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. अद्याप रशियाच्या या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानी वा वित्त हानी माहिती समोरप आलेली नाही.
गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ रशिया आणि युक्रनेमध्ये युद्ध सुरु आहे. रशियाने यापूर्वी ४ जुलैच्या रात्री देखील यक्रेनवर तीव्र हल्ला केला होता. शिवाय त्याच्या एक आठवड्यापूर्वी देखील युक्रेनच्या काही विशिष्ट भांगांना लक्ष्य करण्यात आले होते. रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून हे युद्ध सुरु आहे असून थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा शांतता चर्चा करण्यात आली आहे. परंतु दोन्ही देशांनी एकमेकांच्या अटी मान्य करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ४० दिवसांत रशिया-युक्रेनमध्ये युद्धबंदीचा दावा केला होता. परंतु ट्रम्प देखील यामध्ये अपयशी ठरले आहे. सध्या या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.