Saudi Arabia and Iraq halts supply to India's Nayara Energy
Saudi Arabia News in Marathi : रियाध : सध्या रशियाकडून तेल खरेदीवरुन अमेरिकेने भारतावर ५०% शुल्क (Tariff) लादला आहे. अमेरिकेनंतर युरोपियन युनियननेही भारतावर निर्बंध लादले आहे. असे असतानाच भारताला आणखी एक धक्का बसला आहे. आता सौदी अरेबियाने भारतातील सर्वात मोठ्या तेल कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा बंद केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जगातील सर्वात मोठी तेल कंपनी नायराला सौदीर अरेबियाने कच्चा तेलाच्या पुरवठा बंद केला आहे. सौदी अरेबियाने युरोपियन युनियनने लादलेल्या निर्बंधानुसार, अरामको आणि इराकच्या स्टेट ऑर्गनाझेशन फॉर द मार्केटिंग ऑफ ऑइल (SOMO) या कंपनीने नायरा एनर्जीला कच्चे तेल पुरवणे थांबवले आहे. यामुळे भारतामध्ये नाराजी दिसून येत आहे. संपूर्ण युरोप रशियकडून तेल खरेदी करतो, मात्र भारतावर निर्बंध लादले जात आहे. यामुळे हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
ट्रम्पच्या उलट्या बोंबा! म्हणाले; भारत सगळ्यात जास्त टॅरीफ लावणारा देश, म्हणूनच आम्हीही…
अशा परिस्थितीत सौदी अरेबियाचा निर्णय भारतासाठी मोठा धक्कादायक मानला जात आहे. सौदी अरेबियाच्या तेल कंपन्यांवर सौदीच्या राजघराण्यांचे नियंत्रण असते. सध्या सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या कंपन्यांचे व्यवहार पाहत आहे. मात्र आता SOMO ने भारताच्या नायरा एनर्जीला तेल पुरवणे थांबवले आहे.
सध्या सौदीच्या या निर्णयामुळे भारताला मोठे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून भारताला रशियाकडून तेल खरेदी वाढवावी लागणार आहे, पण यामुळे डोनाल्ड ट्रम्प अधिक नाराज होण्याची शक्यता आहे. शिवाय इराकने देखील काही काळासाठी तेल पुरवठा बंद केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर केले गंभीर आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत, ज्याला भारताने स्पष्ट नकार दिला आहे. ट्रम्प यांच्या मते, भारत रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात आर्थिक मदत करत आहे. परंतु भारताने स्पष्ट केले आहे की, भारत केवळ राष्ट्रीय हितासाठी आणि जागतिस स्थैर्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करत आहे. शिवाय युरोपीय देश, चीनही रशियाकडून तेल खरेदी करतात, मग भारतावरी कर हा अन्याकारक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारतावर निर्बंध लादले आहेत.
शिवाय ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, भारताने सर्व टॅरिफ संपवण्याची ऑफर दिली होती असा दावा केला आहे. पण ही ऑफर त्यांनी भारतावर टॅरिफ (Tariff) लादल्यानंतर मिळाली असेही त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत हा अमेरिकेवर सर्वाधिक टॅरिफ लावणार देश आहे.