Afghanistan Earthquake : पुन्हा एकदा हादरला अफगाणिस्तान; कमी तीव्रतेमुळे भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Afghanistan Earthquake news in Marathi : काबूल : अफगाणिस्तान नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या झटक्यातून सावरत असताना पुन्हा एक झटका बसला आहे. पुन्हा एकदा भूकंपाच्या झटक्यांना अफगाणिस्तान हादरला आहे. गुरुवारी (४ सप्टेंबर) अफगाणिस्तानमध्ये ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूंकपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूंकपाची खोली १३५ किलोमीटर खोल होती. सध्या या दुसऱ्या भूकंपामुळे कोणती जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
भारतीय वेळेनुसार, सकाळ १०. ४० वाजता हा भूंकप झाला. यापूर्वी बुधवारी(३ सप्टेंबर) रात्री उशिरा ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तर यापूर्वी रविवारी ३१ ऑगस्ट रोजी ६.० तीव्रतेचा भूंकप झाला होता. सध्या या भूंकपामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आतापर्यंत १४११ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ हजाराहून अधिक लोका जखमी झाले आहेत. शिवाय अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
कमी तीव्रतेच्या भूंकपामुळे जास्त धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण कमी तीव्रतेच्या भूकंपामुळे जमिनीवर जास्त कंपने होतात. यामुळे इमारतींना अधिक नुकसान होत आहे आणि जीवितहानीची शक्यता वाढत आहे.
अफगाणिस्तानमधील या भूंकपाचा सर्वाधिक परिणाम कुनार आणि नांगरहार प्रांतामध्ये झाला आहे. अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तसचे ३००० लोक जखमी झाले आहेत.
EQ of M: 4.8, On: 04/09/2025 10:40:56 IST, Lat: 34.38 N, Long: 70.37 E, Depth: 135 Km, Location: Afghanistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjcVGs @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/c52IhLhKSn— National Center for Seismology (@NCS_Earthquake) September 4, 2025
आंतरराष्ट्रीय मदत
सध्या ब्रिटन, चीन आणि भारताकडून अफगाणिस्तानला मदत पुरवली जात आहे. भारताने १००० कुटुंबासाठी तात्परुते तंबु उभारले आहे. तसेच अन्नाधान्याचा साठा पाठवला आहे. अजूनही मदत पाठवली जात आहे. ब्रिटनने देखील आपत्कालीन सेवांच्या आणि आरोग्य सेवांची १.३५ दशलक्ष डॉलर्सची मदत पुरवली आहे. तर चीनने आपत्ती निवारणासाठी मदतीची घोषणा केली आहे.
FAQs ( संबंधित प्रश्न)
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आत असलेल्या टेक्टोनिक प्लेट्स सतत एकमेकींवर आदळतात असतात. ज्यामुळे घर्षण तयार होते आणि दाब तयार निर्माण होता. यामुळे प्लेट्स तुटू लागतात आणि ऊर्जा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. ज्यामुळे भूंकप घडतात.
अफगाणिस्तानमध्ये भूकंप का होतात?
अफगाणिस्तान हा हिंदुकुश पर्वतांमध्ये वसला आहे. हिंदुकुश पर्वत हा अल्पाइन बेल्टचा भाग असून हे क्षेत्र भूकंपप्रवण आहे. यामुळे या भागात सतत भूकंप होत असतात.
भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते?
भूकंपाची तीव्रता आणि वेळ मोजण्यासाठी सिस्मोग्राफ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याच्या मदतीने पृथ्वीच्या आत होणाऱ्या कंपनांचा आलेख तयार केला जातो. याला भूकंपमापक म्हणतात. यावरुन, भूकंपाच्या लाटांची तीव्रता, भूकंपाचे केंद्र आणि ऊर्जा रिश्टर स्केलद्वारे शोधली जाते.