
Saudi Arabia announces significant changes to labor laws bans visa confiscation and gives Indians a month's leave
Saudi Arabia new labor laws December 2025 : सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) नोकरीसाठी जाणाऱ्या लाखो भारतीय कामगारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. सौदी सरकारने आपल्या कामगार कायद्यांमध्ये (Labor Laws) क्रांतिकारी बदल केले असून, विशेषतः कृषी आणि पशुपालन क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. सौदीचे मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्री अभियंता अहमद अल-राजी यांनी या नवीन कायद्यांना मंजुरी दिली आहे. या बदलांमुळे केवळ कामाच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही, तर कामगारांचे शोषण थांबवण्यासही मदत होणार आहे.
नवीन कायद्यानुसार, आता प्रत्येक कामगाराला दरवर्षी किमान ३० दिवसांची पगारी वार्षिक रजा (Annual Leave) मिळण्याचा अधिकार असेल. जर एखाद्या कामगाराचा करार (Contract) रजा घेण्यापूर्वीच संपला, तर मालकाला त्या रजेच्या बदल्यात पूर्ण रक्कम (Monetary Compensation) देणे अनिवार्य असेल. याशिवाय, ईद-उल-फित्रसाठी ४ दिवस (रमजानच्या २९ व्या दिवसापासून), राष्ट्रीय दिन आणि स्थापना दिनाच्या पगारी सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Justice For Deepu Das: बांगलादेशातील हिंसेवर मोठी अपडेट! 7 आरोपी गजाआड; थरकाप उडवणारा खुलासा आला समोर
वर्षानुवर्षे कामगारांची सर्वात मोठी तक्रार असायची की, सौदीतील मालक (कफील) त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेत असत. मात्र, आता नवीन कायद्याने यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. मालक आता कामगाराचा पासपोर्ट, निवास परवाना (Iqama) किंवा इतर कोणतेही वैयक्तिक सामान जप्त करू शकणार नाही. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मालकांवर कडक कारवाई आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
सौदी सरकारने कामाच्या तासांबाबतही स्पष्टता आणली आहे:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NASA : ग्रहांच्या निर्मितीची ‘लाईव्ह’ फिल्म! Hubble टेलिस्कोपने टिपले एका शक्तिशाली स्फोटाचे थरारक दृश्य, पहा VIDEO
कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील कामगारांना राहण्यासाठी योग्य निवारा (Accommodation), अन्न किंवा अन्न भत्ता आणि कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता पूर्णपणे मालकाची असेल. तसेच, व्हिसा शुल्क किंवा भरती प्रक्रिया खर्चाचा कोणताही बोजा कामगारावर टाकता येणार नाही. दुर्दैवाने कामाच्या दरम्यान कामगाराचा मृत्यू झाल्यास, त्याचा मृतदेह स्वदेशात पाठवण्याचा खर्चही मालकालाच करावा लागेल.
सौदी अरेबियात सुमारे २५ लाखांहून अधिक भारतीय कामगार विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. यातील मोठा हिस्सा हा शेती आणि बांधकाम क्षेत्रात आहे. नवीन कायद्यांमुळे कामगारांना कायदेशीर सुरक्षा कवच मिळाले आहे, ज्यामुळे त्यांची ‘आधुनिक गुलामगिरी’तून मुक्तता होणार आहे. ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत सौदी अरेबिया आपल्या अर्थव्यवस्थेला जागतिक दर्जाची आणि पारदर्शक बनवत आहे, ज्याचा थेट फायदा भारतीय स्थलांतरित कामगारांना होणार आहे.
Ans: नवीन नियमानुसार, कामगारांना वर्षाला ३० दिवसांची पगारी वार्षिक रजा आणि ईद, राष्ट्रीय दिनासारख्या सणांच्या सुट्ट्या मिळतील.
Ans: नाही. नवीन कायद्यानुसार मालकाला कामगाराचा पासपोर्ट किंवा व्हिसा कागदपत्रे जप्त करण्यावर कडक बंदी घालण्यात आली आहे.
Ans: निर्धारित ८ तासांपेक्षा जास्त काम केल्यास मूळ पगाराच्या ५०% अतिरिक्त रक्कम ओव्हरटाइम म्हणून द्यावी लागेल.