Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Loksabha Election 2026: ‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात; काँग्रेसचा गंभीर आरोप; शेती-वाडी अमेरिकेकडे गहाण

लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावरून सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ झाला. राहुल यांनी मंगळवारी दुपारी २ वाजता माजी लग्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकातील एक लेख सभागृहात मांडला.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 04, 2026 | 12:30 PM
Loksabha Election 2026: ‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात; काँग्रेसचा गंभीर आरोप; शेती-वाडी अमेरिकेकडे गहाण
Follow Us
Follow Us:
  • भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करार
  • या करारानंतर राहुल गांधीकडून या करारावर आणि देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
  • अमेरिकेने ‘एपस्टीन फाइल्स’मधील बरेच काही अजून उघड केलेले नाही
Loksabha Election 2026: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करार अंतिम झाल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. ५०० अब्ज डॉलर्सच्या या व्यापारी करारात तेलाव्यतिरिक्त कृषी उत्पादनांचाही समावेश असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. यावरून भारतात राजकीय गदारोळ सुरू झाला असून काँग्रेसने मंगळवारी संसदेत आणि संसदेबाहेर सरकारला धारेवर धरले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या करारावर आणि देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, सभागृहात बोलू न दिल्याने झालेल्या गदारोळानंतर बाहेर येत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी घाबरलेले असून त्यांच्यावर दबाव आहे. हा करार म्हणजे एक ‘साईड शो’ आहे. मोदींनी देशाची शेती आणि शेतकरी अमेरिकेकडे गहाण ठेवले आहेत, असे राहुल म्हणाले.

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट अखेर हटवली; वाय. खेमचंद सिंह असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

अमेरिकेत अदाणींवर जो खटला आहे, तो प्रत्यक्षात मोदींवरच आहे. अमेरिकेने ‘एपस्टीन फाइल्स’मधील बरेच काही अजून उघड केलेले नाही. त्यामुळे मोदी दबावात आहेत. म्हणूनच या कराराची माहिती देशाला ट्रम्प यांच्याकडून मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी अचानक झालेल्या सीजफायरची माहिती ट्रम्प यांनी दिली होती. त्यावेळी शहीद जवानांशी विश्वासघात झाला आणि आता शेतकऱ्यांशी होत आहे, असा आरोप राहुल यांनी लावला.

५०० अब्ज डॉलर्सची डील काय?

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. ते म्हणाले, या करारामध्ये नेमके काय आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. विरोधी पक्ष केवळ स्पष्टता मागत आहे. आम्हाला अटी माहित नाहीत. आमच्याकडे फक्त डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची ‘पोस्ट’ आहे, संसदीय लोकशाहीत एवढेच पुरेसे आहे का? ट्रम्प म्हणतात की है कृषी क्षेत्राशी संबंधित आहे, मग भारतीय शेतकऱ्यांसाठी सुरक्षा तरतुदी काय आहेत, असा सवाल जरूर यांनी केला, ते पुढे म्हणाले की, ट्रम्प याला ५०० अब्ज डॉलर्सचा करार म्हणत आहेत.

वॉशिंग्टनमध्ये ‘मोगॅम्बो’ खुश

वॉशिंग्टनमध्ये मोगॅम्बो खुश आहे. मोदींनी अखेर हार मानली असे दिसते, असे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले. भारत आता रशिया सोडून अमेरिका, व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार का? अमेरिकेकडून जास्त माल खरेदी करण्याच्या अटीमुळे ‘मेक इन इंडिया चे काय होणार?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली! DRDO कडून ‘SFDR’ तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; शत्रूचा थरकाप उडणार

अमेरिकी उत्पादनांवर ‘झिरो टॅरिफ’ का?

काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी सरकारला विचारले की, अमेरिकेचे कापूस, मका, गहू, दुग्धजन्य पदार्थ आणि सफरचंद भारतात कोणत्याही टेरिफशिवाय विकले गेले, तर भारतीय शेतकऱ्यांचे काय होईल? आधी तीन काळ्या कायद्यांद्वारे शेती विकण्याचा कट रचला गेला आणि आता अमेरिकन उत्पादनांना मुक्त रान दिले जात आहे. सरकारने हा करार संसदेत मांडून त्यावर चर्चा करावी.

लोकसभेत गोंधळ, पुन्हा राहुल गांधींना बोलू दिले नाही

लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावरून सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ झाला. राहुल यांनी मंगळवारी दुपारी २ वाजता माजी लग्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकातील एक लेख सभागृहात मांडला. ते म्हणाले, मला बोलू दिले जावे. मी विरोधी पक्षनेता आहे. मी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारत आणि चीनमध्ये काय घडले, हे मी सांगत आहे. पूर्व लडाखमध्ये आपले सैनिक शहीद झाले. त्यांनी असे म्हणताच एनडीए खासदारांनी त्यांना रोखण्यास सुरुवात केली. राहुल १४ मिनिटे बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण गदारोळ वाढत गेला. सोमवारीही त्यांनी ४६ मिनिटे बोलण्याचा प्रयत्न केला होता.

पडोळे यांच्यासह ८ खासदार निलंबित

स्पीकरच्या दिशेने कागद फेकल्याची घटना सभागृहाच्या मयदिचे उल्लंधन मानली गेली. पीठासीन अधिकारी सैकिया यानी काँग्रेसचे भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे, लुधियानाचे खासदार अमरिंदरसिंग राजा वाडिंग, मणिकम टागोर, किरण कुमार रेड्डी, हिबी ईडन, गुरुजीत औजला, डीन कुरियाकोस आणि एस. वेंकटेशन या ८ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले.

Web Title: Lok sabha election 2026 the trade deal with america is a betrayal of farmers alleges congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • America news
  • india
  • Loksabha
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
2

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.