सौदी अरेबियाच्या 'या' नियमाचा लाखो भारतीयांना होणार फायदा; रोजगार मिळण्यास येणार नाही अडचण
सौदी अरब: आता सौदी अरेबियात नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सौदी अरेबियाने परदेशी कर्मचाऱ्यांच्या नियमांमध्ये काही विशिष्ट बदल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरब सरकारने 1 डिसेंबर 2024 ते 29 जानेवारी 2025 या कालावधीत परदेशी कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या नियमांनुसार, “ग्रेस पीरियड” दरम्यान, परवानगीशिवाय नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली स्पॉन्सरशिप ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
Qiwa प्लॅटफॉर्मचा उपयोग
यासाठी सौदीच्या ह्युमन रिसोर्सेस अँड सोशल डेव्हलपमेंट मंत्रालयाने (MHRSD) Qiwa नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. यामुळे परदेशी कर्मचारी Qiwa प्लॅटफॉर्मच्या मदतीने कर्मचारी सैलरी सर्टिफिकेट, तसेच अनुभव प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळवू शकतात. सौदी अरबच्या या नव्या उपक्रमाचा उद्देश श्रम बाजारात स्थिरता निर्माण करणे हा आहे. परवानगीशिवाय नोकरी सोडल्याने निर्माण होणारी अस्थिरता टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
सौदी अरब सरकारचे उद्दिष्ट
हा निर्णय घेण्यामागे सौदी सरकारचा उद्देश आहे की परदेशी कर्मचाऱ्यांना सुधारण्याची आणि दुसरा संधी देण्याची संधी मिळावी. ज्या लोकांनी या नियमांचे पालन केले नाही, त्यांना आता Qiwa प्लॅटफॉर्मद्वारे आपली स्थिती कायदेशीर करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे नियोक्ते व कामगार यांच्यात विश्वास निर्माण होईल आणि प्रक्रिया पारदर्शक व सुलभ होईल. अनेद परदेशी कर्मचाऱ्यासाठी ही उत्तम संधी आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ग्रेस पीरियडचा फायदा कसा घेता येईल?
या ग्रेस पीरियडचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला Qiwa प्लॅटफॉर्मवर लॉग इन करायचे आहे.
तसेच, यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांसाठी तुम्ही याद्वारे अर्ज करु शकता. नियोक्त्याच्या मंजुरीनंतर प्रमाणपत्र मिळवू शकता. याशिवाय नवीन नियोक्त्याकडे स्पॉन्सरशिप ट्रान्सफर करता येईल. तसेच तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर देखील याद्वारे काढता येईल.
भारतीयांसाठी फायदे
2022 च्या अहवालानुसार, सौदी अरबमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या पाचपट वाढली आहे. 2022 मध्ये तब्बल 1,78,630 भारतीयांनी सौदीत रोजगार मिळवला होता. नव्या नियमांमुळे अनेक भारतीयांना दुसऱ्या संधीचा फायदा मिळेल, तसेच नोकरदार बाजारात स्थैर्य राहील. सौदी सरकारचा हा निर्णय परदेशी कामगारांसाठी मोठा दिलासा ठरेल. नोकरी बदलणे सोपे होईल, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होईल. त्यामुळे भारतीय कामगारांसाठी सौदी अरब एक उत्तम रोजगाराचे ठिकाण ठरेल.