Saudi Arabia Pushing for Recognition of a Palestinian State
सध्या पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र देशाची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोर धरत आहे. नुकतेच या मागणीला युरोपीय देश फ्रान्सने मान्यता दिली आहे. परंतु यावर इतर युरोपीय राष्ट्रांनी विरोध दर्शवला आहे. तसेच अमेरिका आणि इस्रायल देखील यावर नाराजी व्यक्त करत आहेत. याच वेळी दुसरीकडे सौदी अरेबियाने देखील पॅलेस्टाइनला वेगळा देश म्हणून घोषित करण्यासाठी इस्रायलविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पॅलेस्टाईनला फ्रान्सकडून प्रथम मान्यता मिळाल्यानंतर सौदी अरेबियाने आपली भूमिका मांडल्याने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची देखील चिंता वाढली आहे. सौदी अरेबिया संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहे. यावेळी या परिषदेदरम्यान इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या द्वि-राष्ट्र मुद्यावरही चर्चा केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ आणि २९ जुलै रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये संयुक्त राष्ट्रांची बैठक होणार आहे. या दरम्यान पॅलेस्टिनींच्या द्वि-राष्ट्र मुद्यावर महत्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा इस्रायलचे गाझामधील हिंसाचार वाढत आहे. मात्र या प्रस्तावाला इस्रायलने तीव्र विरोध केला आहे.
अखेर संघर्ष थांबला! कंबोडिया-थायलंडमध्ये कधीपासून लागू होणार युद्धबंदी? जाणून घ्या
परंतु सौदी अरेबियाची मागणी मान्य झाल्यास हा इस्रायलसाठी सर्वात मोठा धक्का असणार आहे. विशेष करुन सौदी अरेबिया गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायलविरोधी भूमिका घेत आहे, तसेच पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र राष्ट्राला सहमती दर्शवत आहे. यापूर्वी सौदी अरेबियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझातील पुनवर्सनाच्या योजनेला देखील विरोध केला होता. यामुळे सौदी अरेबिया यामध्ये यशस्वी झाल्यास ट्रम्प यांनी देखील मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या सौदी अरेबियाच्या प्रयत्नांमुळेच फ्रान्सने इस्रायलला बाजूला ठेवून पॅलेस्टाईनला मान्यता दिली असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे. सौदीचे क्राऊन प्रिन्स यांच्या मते, पॅलेस्टाइन वेगळा देश झाल्यानंतर गाझा आणि गाझाच्या पट्टीच्या इतर भागांमध्ये स्थिरतेचे वातावरण निर्माण होईल. गाझा आणि हमासमध्ये शांतता प्रस्थापित होईल. यामुळे सौदी अरेबिया यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे.
सध्या सौदी अरेबिया संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे इस्रायलविरोधी मोठी योजना आखत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. फ्रानचया परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटन देखील पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या मुद्यावर चर्चा करत आहे. ब्रिटनने पॅलेस्टाईनला द्वि-राष्ट्रीय मान्यता दिल्यास इस्रायलसोबत मोठा खेळ होऊ शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फ्रान्स आणि ब्रिटन संयुक्त राष्ट्राचे कायमस्वरुपी सदस्य आहेत. दोन्ही देश एकत्र आल्यास इस्रायल एकटा पडेल. शिवाय चीन आणि रशिया आधीच इस्रायलविरोधी आहे.
थायलंड कंबोडिया संघर्षादरम्यान बँकॉकमध्ये हिंसाचार; गोळीबारात सहा जणांचा मृत्यू