
फोटो सौजन्य AI
याआधी भारताने ऑपरेशन सिंधुरच्या वेळी तुर्की पाकिस्तान मैत्री पाहिली होती . आज त्यात भर म्हणून सऊदी अरब सहभागी झाला आहे . आखाती देश हे नेहमीच उघडपणे किंवा पडद्यामागून पाकिस्तानला मदत करत आल्याचे भारताने पाहिले आहे . पण राजकीय विश्लेषकांच्या मते या कराराचा भारताला कसलाही धोका नाही . पण तरीही भारत आशियातील सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे .
US-China Trade War : ट्रम्प यांच्या नव्या निर्बंधांना चीनचा जोरदार पलटवार; अमेरिकन कंपन्यांवर कारवाई
एका देशावर हल्ला म्हणजे तिन्ही देशांवर हल्ला असे मानले जाईल म्हणजेच गरज पडल्यास तिन्ही देश एकमेकांसाठी संरक्षण करायला उभे राहतील .
संयुक्त लष्करी सराव नियमितपणे आयोजित केले जातील
गुप्तचर माहिती अधिक वेगाने आणि समन्वयाने शेअर केली जाईल
संरक्षण तंत्रज्ञान , ड्रोन तंत्रज्ञान , क्षेपणास्त्र प्रणाली , शस्त्र निर्मिती यात सहकार्य वाढवले जाईल
भविष्यात इतर मित्र देशांना सहभागी केले जाऊ शकते
हा करार अश्यावेळेस झाला आहे जेव्हा मध्य पूर्वेत इराण आणि गाझा सोबतच संघर्ष तीव्र झाला आहे . आणि यामुळे मध्य पूर्वेतील शांती नष्ट झाली असून हळूहळू इतर देश या युद्धात सहभागी होत आहेत . अमेरिकेचे सैन्य स्थळ असून सुद्धा इराणने आखाती देशातील प्रमुख शहरांवर हल्ले करून आपली हल्ला करण्याची क्षमता दाखवून दिली आहे . यामुळे या कराराकडे विशेष करार म्हणून पाहिलं जात आहे . नुसत्या अमेरिकेवर आपली सुरक्षा जबाबदारी सोडून आता चालणार नाही हि भावना यामागे असल्याचे देखील बोलले जात आहे . त्याचमुळे सऊदी अरेबिया आता वेगवेगळे मार्ग अवलंबू पाहत आहे . असे जाणकार सांगत असल्याचे कळत आहे .
सध्या हा करार भारताविरोधी असल्याचे कोणतेही अधिकृत संकेत नाहीत . मात्र पाकिस्तान आणि तुर्की यांचे वाढते संरक्षक सहकार्य तसेच सऊदी अरेबियाचा सहभाग यामुळे दक्षिण आशिया आणि पश्चिम आशिया इथल्या सामरिक समीकरणांवर याचा परिणाम होऊ शकतो . त्यामुळे भारत निश्चितच आपले बारीक लक्ष या कडे ठेवले असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत .