Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार

Houthi Attacks : मक्का करारातून पाकिस्तान आणि तुर्कस्तानने माघार घेतल्यानंतर, सौदी अरेबियाने हुथी हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी इस्रायलकडून गुप्तचर मदत मागितली, ज्यामुळे मक्का संरक्षण करार पूर्णपणे उघडकीस आला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 16, 2026 | 04:22 PM
Saudi Israel Intelligence Deal Houthi Attacks Saudi Arabia

Saudi Israel Intelligence Deal Houthi Attacks Saudi Arabia

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत मोठी मुत्सद्दी घडामोडी
  • पाकिस्तान आणि तुर्कीची माघार
  • मक्का सुरक्षेचा मुद्दा

मध्यपूर्वेतील राजकारणात आणि जागतिक सुरक्षेच्या क्षेत्रात एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर मोठी घडामोडी घडताना दिसत आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांचे (Houthi Attacks) सातत्याने होणारे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र हल्ले तसेच लाल समुद्रातील सागरी नाकेबंदीमुळे सौदी अरेबिया सध्या अत्यंत गंभीर सुरक्षा संकटाचा सामना करत आहे. या वाढत्या धोक्यापासून आपल्या देशाच्या सीमा आणि पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी सौदी अरेबियाने एक मोठा मुत्सद्दी मार्ग निवडला आहे. औपचारिक राजनैतिक संबंध नसतानाही सौदीने अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) मार्फत इस्रायलकडून अत्यंत गोपनीय गुप्तचर माहिती (ISR – Intelligence, Surveillance, and Reconnaissance) मिळवण्यास सुरुवात केल्याचे अहवाल समोर आले आहेत.

या संपूर्ण घडामोडीमागे सौदी अरेबियाचे पारंपरिक आणि नवीन प्रादेशिक मित्रदेश मागे हटल्याचे कारण सांगितले जात आहे. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्किये यांच्यात नुकताच परस्पर संरक्षण करार झाला होता, ज्यानुसार एका देशावरील हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जावा अशी तरतूद होती. मात्र, हुथी बंडखोरांचा धोका वाढल्यानंतर सौदीने जेव्हा पाकिस्तान आणि तुर्कीकडे थेट लष्करी मदतीची मागणी केली, तेव्हा दोन्ही देशांनी येमेनमधील लढाईत थेट हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारामुळे सौदी अरेबियाला आपल्या सुरक्षेसाठी नव्या आणि अनपेक्षित समीकरणांचा विचार करावा लागला आहे.

अमेरिकेची मध्यस्थी आणि सेंटकॉमची (CENTCOM) भूमिका

सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात अधिकृत राजनैतिक संबंध नसल्यामुळे रियाधने इस्रायलशी थेट चर्चा न करता अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती लष्करी कमांड म्हणजेच ‘सेंटकॉम’च्या माध्यमातून हे गुप्तचर सहकार्य आकारास येत आहे. या करारानुसार, इस्रायल सौदी अरेबियाला हुथी बंडखोरांच्या सामरिक ठिकाणांची, त्यांच्या लढाऊ तुकड्यांच्या हालचालींची आणि क्षेपणास्त्र तळांची अचूक माहिती पुरवणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

जेरुसलेम पोस्टसह अनेक आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे सहकार्य सध्या केवळ सुरक्षेशी संबंधित गुप्त माहिती सामायिक करण्यापुरतेच मर्यादित आहे. परंतु, राजकीय विश्लेषकांच्या मते, या सहकार्यामुळे भविष्यात सौदी आणि इस्रायल यांच्यातील ऐतिहासिक ‘अब्राहम कराराची’ (Abraham Accords) प्रक्रिया पुन्हा रुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मक्का शहराच्या सुरक्षेचा प्रश्न आणि वाढता ताण

या ताज्या वादाला आणि सुरक्षेच्या चिंतेला अधिक तीव्र वळण मिळाले ते मक्का शहराच्या दिशेने आलेल्या एका संशयित ड्रोनच्या घटनेमुळे. सौदी लष्करी अधिकाऱ्यांनी असा दावा केला होता की त्यांनी पवित्र मक्का शहराच्या दिशेने येणारा एक हुथी ड्रोन हवेतच नष्ट केला. जरी हुथी बंडखोरांनी मक्काला लक्ष्य केल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असला, तरी या घटनेने सौदी प्रशासनाची झोप उडवली आहे.

याशिवाय, हुथींच्या हल्ल्यांचा थेट फटका सौदी अरेबियाच्या ऊर्जा क्षेत्राला बसला आहे. सौदीतील प्रमुख तेलवाहिन्या, रिफायनरी आणि पंपिंग स्टेशनवर झालेल्या हल्ल्यांमुळे तेलाचा पुरवठा अंशतः बाधित झाला होता. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या ‘बाब अल-मंदेब’ सामुद्रधुनीतील सागरी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरही मोठे सावट निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh ICT Verdict : बांगलादेशात राजकीय भूकंप! 500 दिवसांनंतर बदला राजकीय? अवामी लीगच्या 7 बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा

पाकिस्तान आणि तुर्कियेचे सावध पाऊल

सौदी अरेबियाच्या या संकटात पाकिस्तान आणि तुर्किये यांनी घेतलेली भूमिका अत्यंत गुंतागुंतीची ठरली आहे. पाकिस्तानने सौदी-येमेन सीमेजवळ सुरक्षा बळकट करण्यासाठी आपले सैन्य तैनात केले असले आणि इराणला हुथींना रोखण्यासाठी संदेश पाठवले असले, तरी थेट युद्धात उतरणे टाळले आहे. दुसरीकडे, तुर्कीनेही सौदीच्या सुरक्षेला पाठिंबा दर्शवला असला, तरी लष्करी पाऊल उचलणे टाळले आहे.

एकंदरीत पाहता, पाकिस्तान आणि तुर्कीच्या या भूमिकेमुळे सौदी अरेबियाने इस्रायलच्या तंत्रज्ञान आणि गुप्तचर क्षमतेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्यपूर्वेतील पारंपरिक वैर विसरून सुरक्षेच्या कारणास्तव नवी युती आकार घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Web Title: Saudi arabia seeks israel intelligence help via us centcom against houthi threats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Houthi
  • Israel
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

France Protest : फ्रान्समध्ये महागाई अन् बजेट कपातीविरोधात उद्रेक; पॅरिसमध्ये 6 लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर
1

France Protest : फ्रान्समध्ये महागाई अन् बजेट कपातीविरोधात उद्रेक; पॅरिसमध्ये 6 लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर

POK Violence: नालायकपणाचा कळस! स्वतःच्या नागरिकांना मारत सुटली Pakistan Army; ‘इतके’ ठार तर…
2

POK Violence: नालायकपणाचा कळस! स्वतःच्या नागरिकांना मारत सुटली Pakistan Army; ‘इतके’ ठार तर…

Elon Musk : ट्रम्प यांच्या पराभवामुळे मस्क यांच्या अडचणी वाढल्या; लवकरच डेमोक्रॅट्स करणार राजकीय संपर्कांची चौकशी
3

Elon Musk : ट्रम्प यांच्या पराभवामुळे मस्क यांच्या अडचणी वाढल्या; लवकरच डेमोक्रॅट्स करणार राजकीय संपर्कांची चौकशी

Israel Elections : नेतान्याहू पुन्हा पंतप्रधान होणार? इस्रायलच्या राजकारणात खळबळ; राष्ट्राध्यक्ष भवनात रंगल्या बैठका
4

Israel Elections : नेतान्याहू पुन्हा पंतप्रधान होणार? इस्रायलच्या राजकारणात खळबळ; राष्ट्राध्यक्ष भवनात रंगल्या बैठका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.