Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

India Bangladesh Relations : जमात-ए-इस्लामीने भारतीय अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकींचे वृत्त फेटाळून लावले. शफीकुर रहमान म्हणाले की भारताच्या विनंतीवरून बैठका गुप्त ठेवण्यात आल्या होत्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 02, 2026 | 10:46 AM
Secret deal between India and Jamaat-e-Islami Shafiqur Rehman's big revelation on the secret meeting of the Indian ambassador

Secret deal between India and Jamaat-e-Islami Shafiqur Rehman's big revelation on the secret meeting of the Indian ambassador

Follow Us
Close
Follow Us:
  •  जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी भारतीय राजदूतांसोबत झालेल्या एका विशेष बैठकीची कबुली दिली असून, ही बैठक भारताच्या विनंतीवरून गुप्त ठेवण्यात आली होती, असा दावा केला आहे.
  • बांगलादेशातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत आता केवळ अवामी लीगवर अवलंबून न राहता सर्व प्रमुख राजकीय शक्तींशी, विशेषतः जमात आणि बीएनपीशी संवाद साधत असल्याचे संकेत मिळत आहेत.
  • शेख हसीना यांचे भारतात राहणे हे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे विधान करून रहमान यांनी भारतासमोर एक नवीन पेच निर्माण केला आहे.

India Bangladesh secret meeting Jamaat-e-Islami 2026 : बांगलादेशातील आगामी १२ फेब्रुवारी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी दक्षिण आशियातील राजकारण एका नवीन वळणावर पोहोचले आहे. भारताचे कट्टर विरोधक मानले जाणारे जमात-ए-इस्लामी (Jamaat-e-Islami) आणि भारतीय अधिकारी यांच्यात एक ‘गुप्त बैठक’ पार पडल्याचा खळबळजनक दावा जमातचे अमीर डॉ. शफीकुर रहमान यांनी केला आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी या बैठकीची कबुली दिली, ज्यामुळे भारत आता बांगलादेशातील (India Bangladesh relations) नव्या राजकीय समीकरणांशी जुळवून घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

भारताच्या विनंतीवरून बैठक ‘सिक्रेट’?

डॉ. शफीकुर रहमान यांनी सांगितले की, गेल्या वर्षी त्यांच्या बायपास सर्जरीनंतर अनेक देशांच्या राजदूतांनी त्यांची भेट घेतली होती. याच काळात दोन भारतीय राजनैतिक अधिकारी (Diplomats) देखील त्यांना भेटायला आले होते. रहमान यांच्या मते, इतर देशांचे राजदूत उघडपणे भेटले, मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी ही भेट ‘कॉन्फिडेंशियल’ (Confidential) म्हणजेच गुप्त ठेवण्याची विनंती केली होती. “आम्ही सर्वांशी संवाद साधण्यास तयार आहोत. परस्पर संबंध सुधारण्यासाठी पारदर्शकता आवश्यक आहे,” असे म्हणत रहमान यांनी भारताच्या या ‘गुप्त’ धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

शेख हसीना यांच्यामुळे संबंधात दुरावा?

मुलाखती दरम्यान शफीकुर रहमान यांनी भारताला एक स्पष्ट संदेश दिला आहे. ५ ऑगस्ट २०२४ च्या सत्तापालटानंतर शेख हसीना भारतात आश्रयाला आहेत, यावरून जमातने नाराजी व्यक्त केली आहे. “शेख हसीना यांचे भारतात राहणे हाच भारत आणि बांगलादेशमधील संबंध सुधारण्यातील मुख्य अडथळा आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. भारत जोपर्यंत हसीना यांना पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत बांगलादेशातील जनभावना भारताच्या विरोधात राहतील, असे संकेत जमातने दिले आहेत.

BIG: India moves to ISOLATE Muhammad Yunus in Bangladesh’s power chessboard.
After Khaleda Zia’s death, PM Modi bypassed protocol, wrote directly to Tarique Rahman.
Jaishankar hand delivered the message.
New Delhi won’t allow Bangladesh to drift into a “Bengali Pakistan. 🇮🇳🔥 pic.twitter.com/tZYl3Ppr9d
— @VijayBharat (@shikhar711) January 2, 2026

credit : social media and Twitter

भारताची रणनीती काय आहे?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या बैठकीवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आता बांगलादेशात ‘बॅलन्स्ड अप्रोच’ (Balanced Approach) स्वीकारत आहे. केवळ शेख हसीना यांच्या अवामी लीगवर विसंबून राहण्यापेक्षा, भविष्यात सत्तेवर येऊ शकणाऱ्या बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांसारख्या पक्षांशी संवाद ठेवणे ही भारताची मजबुरी आणि रणनीती दोन्ही आहे. बांगलादेशातील वाढता पाकिस्तानी प्रभाव रोखण्यासाठी भारत या ‘बॅकचॅनेल’ डिप्लोमसीचा वापर करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

जमातचा ‘नॅशनल कन्ससस’ सरकारचा प्लॅन

निवडणुकीनंतर जमात-ए-इस्लामी एकट्याने सत्ता स्थापन करण्याऐवजी सर्व पक्षांना सोबत घेऊन ‘राष्ट्रीय सहमतीचे सरकार’ (National Consensus Government) स्थापन करण्यास उत्सुक आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सर्वसमावेशक राजकारण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे रहमान यांनी सांगितले. या नवीन सरकारमध्ये भारताची भूमिका काय असेल आणि भारत जमातच्या या ‘मैत्रीच्या हाताला’ कसा प्रतिसाद देतो, यावर दक्षिण आशियातील सुरक्षा अवलंबून असेल.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: जमात-ए-इस्लामी आणि भारतीय अधिकार्यांची बैठक कुठे झाली?

    Ans: ही बैठक ढाका येथील शफीकुर रहमान यांच्या निवासस्थानी झाल्याचा दावा करण्यात आला असून, ही भेट त्यांच्या वैद्यकीय उपचारानंतरची एक सदिच्छा भेट होती.

  • Que: भारताने ही बैठक गुप्त ठेवण्याची विनंती का केली?

    Ans: भारताचे अवामी लीगशी जुने संबंध आहेत, त्यामुळे कट्टरपंथी पक्षाशी संवाद साधणे हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने ही गुप्तता पाळली गेली असावी, असे मानले जाते.

  • Que: आगामी निवडणुकीत जमातची भूमिका काय असेल?

    Ans: जमात १२ फेब्रुवारी २०२६ च्या निवडणुकीत सहभागी होणार असून, ते बीएनपी किंवा इतर पक्षांसोबत मिळून 'युनिटी गव्हर्नमेंट' स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Secret deal between india and jamaat e islami shafiqur rehmans big revelation on the secret meeting of the indian ambassador

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • International Political news

संबंधित बातम्या

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
1

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
2

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
3

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
4

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.