ट्रम्पचे पाकिस्तानवरील प्रेम संपेल, बांगलादेशही गुडघे टेकेल, वाचा २०२६ मध्ये भारताच्या राजनैतिकतेसाठी खिडकी कशी उघडणार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India foreign policy 2026 Trump Pakistan : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘वेळ’ आणि ‘परिस्थिती’ कधी बदलेल याचा नेम नसतो. २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अमेरिका फर्स्ट (America First) धोरणामुळे भारतासमोर जी आव्हाने उभी होती, ती २०२६ मध्ये मोठ्या संधीत रूपांतरित होताना दिसत आहेत. पाकिस्तानने ट्रम्प यांच्यासमोर केलेली शरणागती आता त्यांच्याच अंगाशी आली असून, दुसरीकडे अस्थिर बांगलादेशला सावरण्यासाठी भारताशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. २०२६ मध्ये भारताच्या राजनैतिकतेसाठी एक मोठी खिडकी कशी उघडणार, याचे हे सविस्तर विश्लेषण.
२०२५ मध्ये पाकिस्तानने ट्रम्प प्रशासनाला खुश करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, कट्टरवाद, बलुचिस्तानमधील चीनचा वाढता हस्तक्षेप आणि सौदी अरेबियाशी असलेले गुंतागुंतीचे संबंध यामुळे पाकिस्तान आता अमेरिकेच्या रडारवर आला आहे. ट्रम्प यांना अशा भागीदाराची गरज आहे जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि लोकशाहीवादी असेल, जिथे भारत चपखल बसतो. जेव्हा पाकिस्तान अमेरिकेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरेल, तेव्हा वॉशिंग्टनचा कल पुन्हा एकदा नवी दिल्लीकडे झुकणार हे स्पष्ट आहे. संरक्षण आणि उच्च तंत्रज्ञान (iCET) क्षेत्रात भारताची अमेरिकेसोबतची भागीदारी २०२६ मध्ये निर्णायक ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी
चीनचा ‘सीपेक’ (CPEC) प्रकल्प आणि ग्वादर बंदरावरील ताबा यामुळे अमेरिका आधीच सावध आहे. पाकिस्तानने जर अमेरिकन कंपन्यांना आपल्या देशात थारा दिला, तर चीन नाराज होतो आणि चीनला जवळ केले तर अमेरिका आर्थिक रसद तोडते. या दुहेरी कात्रीत पाकिस्तान अडकला आहे. याउलट, भारत हा दक्षिण आशियातील एक स्थिर शक्ती म्हणून उभा आहे. आखाती देशांशी (सौदी आणि युएई) भारताचे असलेले घनिष्ट संबंध २०२६ मध्ये पाकिस्तानला राजनैतिकदृष्ट्या एकाकी पाडण्यासाठी पुरेसे आहेत.
बांगलादेश सध्या राजकीय अस्थिरता आणि त्यांच्या कणा असलेल्या कापड (Textile) उद्योगाच्या घसरणीचा सामना करत आहे. जागतिक ब्रँड्स आता बांगलादेशला असुरक्षित मानू लागले आहेत. अशा वेळी ‘विश्वासार्ह पुरवठादार’ म्हणून जगाची नजर भारतावर आहे. २०२६ च्या निवडणुकीनंतर बांगलादेशात जे कोणी सत्तेवर येईल, त्यांना आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी भारताच्या सहकार्याची आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांची अत्यंत गरज भासणार आहे. भारत-बांगलादेश संबंधांमध्ये हा ‘डिस्ट्रेस कॉल’ भारतासाठी आपली अटी मान्य करून घेण्याची मोठी संधी असेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Election 2026 : तारिक रहमानच्या बांगलादेशातील प्रवेशामुळे जमात अडचणीत; पक्ष वाचवण्यासाठी वापरली ‘ही’ युक्ती
२०२६ हे वर्ष दक्षिण आशियासाठी महत्त्वाचे आहे कारण बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ (Neighborhood First) धोरणाची दिशा ठरवतील. जर या देशांमध्ये भारत-अनुकूल सरकारे आली, तर दहशतवादविरोधी मोहीम आणि प्रादेशिक व्यापार आणखी मजबूत होईल. रशिया आणि चीनच्या वाढत्या जवळीकीला रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासन भारताला एक ‘बॅलन्सिंग पॉवर’ म्हणून बघेल, ज्यामुळे भारताच्या राजनैतिक खिडकीतून विकासाची मोठी संधी चालून येईल.
Ans: व्यापार आणि टॅरिफवरून काही वाद असले तरी, चीनला रोखण्यासाठी आणि संरक्षण तंत्रज्ञानासाठी ट्रम्प प्रशासन भारताला सर्वात महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार मानणार आहे.
Ans: बांगलादेशातील कापड उद्योगाला लागलेल्या घरघरीमुळे जागतिक कंपन्या भारताकडे पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून पाहत आहेत, ज्यामुळे भारताच्या निर्यातीत मोठी वाढ होऊ शकते.
Ans: चीनचे कर्ज आणि अमेरिकेच्या दहशतवादविरोधी अटी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तानला २०२६ मध्ये तीव्र आर्थिक आणि राजनैतिक दबावाचा सामना करावा लागेल.






