Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिमाचलमध्ये 72 तासांची गुप्त बैठक; चीनची अस्वस्थता वाढली, भारताचे धोरण ठाम

Dalai Lama reincarnation controversy : तीन दिवसांच्या या 72 तासांच्या बैठकीत जगभरातील 100 हून अधिक बौद्ध धार्मिक नेते सहभागी होत असून, या बैठकीत दलाई लामांच्या संभाव्य उत्तराधिकारी निवडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 30, 2025 | 02:14 PM
Secret Himachal meet on Dalai Lama's successor rattles China

Secret Himachal meet on Dalai Lama's successor rattles China

Follow Us
Close
Follow Us:

Dalai Lama reincarnation controversy : तिबेटी धर्मगुरू १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांच्या ६ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर धर्मशाळा येथे एक अत्यंत महत्त्वाची व गुप्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या या ७२ तासांच्या बैठकीत जगभरातील १०० हून अधिक बौद्ध धार्मिक नेते सहभागी होत असून, या बैठकीत दलाई लामांच्या संभाव्य उत्तराधिकारी निवडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे चीनमध्ये मोठी अस्वस्थता आणि राजनैतिक हालचाल निर्माण झाली आहे.

2019 नंतरची पहिली मोठी बैठक, गुप्ततेत तयारी

प्रसिद्ध वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक २०१९ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बोलावण्यात आली आहे, आणि तिची आखणी अत्यंत गोपनीयतेने करण्यात आली आहे. बौद्ध धर्मगुरूंच्या या उपस्थितीमुळे आणि संभाव्य उत्तराधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर, ही बैठक जागतिक राजकारणातही चर्चेचा विषय बनली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ग्रोसी’च ठरला इराणवर झालेल्या हल्ल्याचे कारण? डेली इराण मिलिटरीने केला अत्यंत ‘गंभीर’ आरोप

दलाई लामा – केवळ धार्मिक नाही, तर राजकीय नेतृत्वही

दलाई लामा हे बौद्ध धर्मातील सर्वोच्च गुरू मानले जातात. ब्रिटानिकाच्या माहितीनुसार, लामा हे आध्यात्मिक मार्गदर्शक असून ११ व्या शतकात या पदाची स्थापना झाली. १३ व्या दलाई लामांनी चिनी किंग साम्राज्याविरुद्ध तिबेटचे स्वातंत्र्य मिळवले होते. मात्र १९६० च्या सुमारास चीनने तिबेटवर आक्रमण केले आणि त्यानंतर १४ वे दलाई लामा निर्वासित जीवन जगण्यासाठी भारतातील धर्मशाळेत आले. तिथे त्यांनी तिबेटी निर्वासित सरकार स्थापन केली आणि आजही ते तिबेटी लोकांचे आध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून जगभरात ओळखले जातात.

The geopolitical fight over the Dalai Lama’s successor is coming to a head, writes @KarishmaJourno (via @opinion) https://t.co/Irsz6vVGAv — Bloomberg (@business) June 29, 2025

credit : social media

उत्तराधिकारी निवड – पारंपरिक विरुद्ध राजकीय हस्तक्षेप

दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया बौद्ध परंपरेनुसार अतिशय बारकाईने केली जाते. तिबेटमध्ये जन्मलेल्या एखाद्या बालकात विद्यमान लामांचे आत्मिक लक्षण दिसले पाहिजे, अशी परंपरा आहे. मात्र यावेळी चर्चा आहे की नवीन दलाई लामा तिबेटमध्ये न जन्मता भारत किंवा इतर देशात जन्मलेला असू शकतो. हे घडल्यास पारंपरिक ३८५ वर्षांची परंपरा खंडित होऊ शकते, आणि याच मुद्द्यावरून चीनला तीव्र आक्षेप आहे. चीनने आधीच स्पष्ट केलं आहे की ते स्वतःच्या पद्धतीने नवा दलाई लामा नेमू इच्छितात. बीजिंगने मार्च २०२६ मध्ये एका निवेदनात म्हटलं होतं की, “तिबेटी लोक जर चीनचा भाग मानत असतील तरच दलाई लामा निवडीवर चर्चा होऊ शकते.”

चीनची अस्वस्थता वाढली, भारताचे धोरण ठाम

ही बैठक भारताच्या धर्मशाळा येथे होत असल्याने चीन विशेषतः अस्वस्थ आहे. भारताने तिबेटप्रश्नी मोकळं समर्थन दिलं नसल्याचं जरी वारंवार सांगितलं असलं, तरी दलाई लामा आणि तिबेटी निर्वासितांना आश्रय दिला हेच बीजिंगसाठी सततचा अस्वस्थतेचा मुद्दा ठरत आला आहे. दलाई लामांच्या वाढदिवशी नव्या उत्तराधिकारीविषयी कोणतीही घोषणा झाली, तर त्याचा जागतिक आणि राजनैतिक परिणाम मोठा असेल. त्यामुळे चीन या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संयुक्त राष्ट्रात भारताची आक्रमक तयारी; पाकिस्तानचा डाव उधळण्याची रणनीती तयार

 ७२ तासांच्या गुप्त बैठकीमुळे राजकारणात खळबळ

धर्मशाळेतील ही तीन दिवसांची बैठक केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही निर्णायक ठरणार आहे. दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया ही तिबेटच्या भविष्यासाठी तसेच भारत-चीन संबंधांसाठीही निर्णायक ठरू शकते. या बैठकीतील निर्णय तिबेटी जनतेच्या आत्म्याशी संबंधित असला, तरी जगातील दोन महासत्तांमधील तणावात नवे वळण आणू शकतो आणि म्हणूनच चीन ही बैठक अत्यंत अस्वस्थतेने पाहत आहे.

Web Title: Secret himachal meet on dalai lamas successor rattles china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • China
  • Dalai Lama
  • himalaya
  • india

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.