Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दलाई लामांचा नाही तर माओचा पुनर्जन्म शोधा’; तिबेटी निर्वासित सरकारचा चीनवर जोरदार हल्लाबोल

Mao rebirth vs Dalai Lama succession : तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भारत, चीन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 05, 2025 | 11:20 AM
भारताच्या भूमीवर दलाई लामांचा पुनर्जन्म चीनला का सतावतोय? नक्की काय आहे धोरण, वाचा सविस्तर

भारताच्या भूमीवर दलाई लामांचा पुनर्जन्म चीनला का सतावतोय? नक्की काय आहे धोरण, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:

Mao rebirth vs Dalai Lama succession : तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भारत, चीन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. दलाई लामांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा पुनर्जन्म होईल आणि त्यांच्या उत्तराधिकारीची निवड पूर्णपणे आध्यात्मिक पद्धतीनेच केली जाईल. या पार्श्वभूमीवर निर्वासित तिबेटी सरकारचे प्रमुख पेनपा त्सेरिंग यांनी चीनवर जोरदार टीका करत स्पष्ट केले की, पुनर्जन्म हा राजकीय नव्हे तर अध्यात्मिक विषय आहे आणि चीनने त्यात हस्तक्षेप करू नये.

पेनपा त्सेरिंग यांचा चीनला थेट इशारा

पेनपा त्सेरिंग म्हणाले, “जर चीनला खरोखरच पुनर्जन्मावर विश्वास असेल, तर त्यांनी माओ झेडोंग, जियांग झेमिन यांचा आधी पुनर्जन्म शोधावा.” या वाक्यातून त्यांनी चीनच्या दांभिकतेवर कडाडून प्रहार केला. त्यांनी स्पष्ट केले की, चीनने तिबेटी बौद्ध धर्म, संस्कृती आणि मृत्यूनंतरच्या अध्यात्मिक प्रक्रियेचा सखोल अभ्यास केल्याशिवाय अशा मुद्यांवर बोलू नये.

‘गोल्डन युबरन’ पद्धतीला स्पष्ट नकार

चीनकडून अनेकदा असा दावा केला जातो की पुढील दलाई लामाची निवड ‘गोल्ड कलश’ (Golden Urn) पद्धतीने करावी. पण त्सेरिंग यांनी ही कल्पना फेटाळली. त्यांनी सांगितले की, ही पद्धत १७९३ मध्ये चिंग राजवंशाने राजकीय हस्तक्षेपासाठी लादली होती, परंतु त्याआधी पहिले आठ दलाई लामा या प्रक्रियेशिवाय निवडले गेले होते. त्यामुळे ही प्रक्रिया तिबेटी परंपरेचा भाग नसून चीनचा राजकीय डाव आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Texas floods 2025 : टेक्सासमध्ये महापूराचा कहर; 24 मृत, 20 हून अधिक मुली बेपत्ता, बचावकार्य सुरू

उत्तराधिकारी अजून जाहीर होणार नाही

तिबेटी समाजात दलाई लामांच्या उत्तराधिकारीबाबत अनेक अफवा आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना पेनपा त्सेरिंग म्हणाले की, दलाई लामा स्वतः किमान २० वर्षे जगणार असल्याचे म्हणाले आहेत आणि योग्य वेळ आल्यावरच उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यांनी दलाई लामांच्या ९०व्या वाढदिवशी उत्तराधिकारी जाहीर केला जाणार असल्याच्या अफवांनाही फेटाळले.

चीनवर धार्मिक फूट पाडण्याचा गंभीर आरोप

पेनपा त्सेरिंग यांनी चीनवर तिबेटी बौद्ध धर्मीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, चीनचे हे धोरण फार काळ चालणार नाही. “तिबेटी जनतेला धर्म, परंपरा आणि श्रद्धेवर दृढ विश्वास आहे. आम्ही चीनच्या या कारस्थांनांविरुद्ध शांततेच्या मार्गाने लढा देत राहू,” असे ते म्हणाले.

दलाई लामांचे वक्तव्य, चीनसाठी कडवट सत्य

दलाई लामा यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, त्यांच्या परंपरेतून धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गानेच पुढील दलाई लामाची निवड होईल. कोणतीही राजकीय शक्ती मग ती चीन असो किंवा इतर कोणी, या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 57 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा अर्जेंटिनाला दौरा; मोदींच्या भेटीने भारत-दक्षिण अमेरिका संबंधांना नवे वळण

तिबेटचा लढा कायम

तिबेटी धर्मगुरुंच्या उत्तराधिकारीच्या मुद्यावरून चीनने वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, निर्वासित तिबेटी सरकारचा स्पष्ट संदेश आहे की, धार्मिक परंपरा आणि तिबेटी समाजाच्या श्रद्धेवर कोणताही बाह्य हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही. पेनपा त्सेरिंग यांचे वक्तव्य केवळ चीनविरोधी नाही, तर तिबेटी संस्कृती आणि धर्माच्या सन्मानासाठी उभा राहिलेला निर्धार आहे. आता संपूर्ण जगाच्या नजरा या संघर्षावर लागल्या आहेत धर्म विरुद्ध राजकारण!

Web Title: Seek maos rebirth not dalai lamas tibet exiles slam china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • China
  • Dalai Lama
  • india
  • international news

संबंधित बातम्या

Red Fort Blast: अफगाणिस्तानात जाता आले नाही, म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? लाल किल्ला हल्ल्याच्या तपासात धक्कादायक खुलासे
1

Red Fort Blast: अफगाणिस्तानात जाता आले नाही, म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? लाल किल्ला हल्ल्याच्या तपासात धक्कादायक खुलासे

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पक्षाला पाकिस्तानात 30 हजारांहून अधिक मते; तरीही निवडणुकीत पराभव!
2

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पक्षाला पाकिस्तानात 30 हजारांहून अधिक मते; तरीही निवडणुकीत पराभव!

Nvidia News : जेन्सेन हुआंग यांच्याभोवती गुप्तहेरगिरीचा संशय; एनव्हिडियाकडून स्वतंत्र चौकशी सुरू
3

Nvidia News : जेन्सेन हुआंग यांच्याभोवती गुप्तहेरगिरीचा संशय; एनव्हिडियाकडून स्वतंत्र चौकशी सुरू

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
4

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.