
पुरूषांच्या कमतरतेमुळे 'या' देशातील महिलांना तासावर पुरुष घेण्याची आली वेळ
वर्ल्ड अॅटलसनुसार, लाटवियामध्ये ६५ आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट महिला आहेत. न्यू यॉर्क पोस्टनुसार, या वाढत्या लिंग तफावतीमुळे महिला घरकामात मदत करण्यासाठी पतींना कामावर ठेवत आहेत. अहवालानुसार लाटवियाच्या महिला म्हणतात की, त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि दैनंदिन जीवनात पुरुषांची कमतरता जाणवते.
डानिया नावाच्या महिलेने सांगितले की, तिच्या जवळजवळ सर्व सहकारी महिला आहेत. तिला महिलांसोबत काम करायला आवडते, पण कामाच्या ठिकाणी लिंग संतुलन अधिक असेल तर सामाजिकीकरण अधिक आनंददायी होईल असेही तिने म्हटले. दानियाची मैत्रीण झैन म्हणाली की पुरुषांच्या वाढत्या कमतरतेमुळे अनेक महिला जोडीदार शोधण्यासाठी परदेशात जातात.
न्यू यॉर्क पोस्टनुसार, पुरुष जोडीदार नसताना, या देशातील महिलांना दैनंदिन घरकाम करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या कारागिरांचा आधार घ्यावा लागतो. यासाठी, “मॅन विथ गोल्डन हँड्स” नावाचा एक व्यासपीठ उपलब्ध आहे, जो दुरुस्ती आणि इतर घरकामांसाठी भाड्याने घेतलेल्या कारागिरांना पुरवतो. त्याचप्रमाणे, “हसबंड फॉर अ अवर” नावाचा एक व्यासपीठ आहे, जो रंगकाम, पडदे दुरुस्ती आणि इतर देखभालीची कामे जलद हाताळण्यासाठी तासाभराने कारागिरांना कामावर ठेवतो.
मिळालेल्या माहितीनुसार, लातवियामध्ये पुरूषांचे कमी आयुर्मान हे लिंग असमतोलाचे मोठे कारण असू शकते. अनेक पुरुष वर्ग हा धूम्रपानाचे असलेले अधिक प्रमाण आणि जीवनशैलीशी संबंधित आरोग्यच्या समस्यांमुळे पुरूषांचे आयुर्मान याठिकाणी कमी आहे. वर्ल्ड ॲटलसच्या मते, लातवियामधील ३१ टक्के पुरूष धूम्रपान करतात. तर महिलांमध्ये हे प्रमाण केवळ १० टक्के आहे. तसेच अनेक पुरूषांना लठ्ठपणाची समस्या कारणीभूत ठरत आहे.