Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

इस्रायलच्या 'यरुशलम पोस्ट' या वृत्तपत्राने यासंदर्भातील दावा केला असून, अहमदीनेजाद यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 01, 2026 | 09:37 PM
खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! (Photo Credit- X)

खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

 

  • इराणचा कट्टर नेता संपला!
  • इस्रायलचा मोठा सर्जिकल स्ट्राईक
  • भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर
Mahmoud Ahmadinejad Death: मध्य पूर्वेतील युद्धाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर काही तासांतच, इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद (Mahmoud Ahmadinejad) यांचाही इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इस्रायलच्या ‘यरुशलम पोस्ट’ या वृत्तपत्राने यासंदर्भातील दावा केला असून, अहमदीनेजाद यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

इस्रायलविरोधी कट्टर भूमिकेसाठी ओळख

महमूद अहमदीनेजाद यांनी २००५ ते २०१३ या काळात इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत कट्टर आणि पाश्चात्य विरोधी भूमिका घेतली होती. “इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकले पाहिजे,” असे वादग्रस्त विधान करून त्यांनी संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली होती. त्यांच्याच काळात इराणचा अणू कार्यक्रम वेगाने पुढे सरकला, ज्यामुळे इराण आणि पाश्चात्य देशांमधील, विशेषतः अमेरिकेसोबतचे संबंध विकोपाला गेले होते.

“Mahmoud Ahmadinejad, who served as Iranian president from 2005 until 2013, was k*lled in an Israeli-US airstrike, the Iranian Labor News Agency reported on Sunday. The strike hit Ahmedinejad’s residence in Narnak, northeast Tehran, k*lling him and several bodyguards, the… pic.twitter.com/WGXraO6LJk — Paul A. Szypula 🇺🇸 (@Bubblebathgirl) March 1, 2026

Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

रशिया-युक्रेन युद्धावरील भूमिकेमुळे चर्चेत

अहमदीनेजाद हे त्यांच्या पुराणमतवादी धोरणांसाठी प्रसिद्ध असले, तरी अलीकडच्या काळात त्यांनी युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाची कडक शब्दांत निंदा करून जगाला चकित केले होते. इराणचे सध्याचे शासन रशियाच्या बाजूने उभे असताना, अहमदीनेजाद यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले होते. त्यांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे ते पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते.

इराणमध्ये नेतृत्वाचे मोठे संकट

सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई आणि आता महमूद अहमदीनेजाद यांसारख्या बलाढ्य नेत्यांच्या एकापाठोपाठ एक झालेल्या अंतामुळे इराणमध्ये नेतृत्वाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. देशातील राजकीय आणि धार्मिक पोकळी भरून काढणे आता इराणसमोर मोठे आव्हान आहे. या नुकसानीचा बदला घेण्यासाठी इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने (IRGC) इस्रायल आणि अमेरिकेवर मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची धमकी दिली आहे.

अमेरिकन युद्धनौकेवर हल्ल्याचा दावा

खामेनेई आणि अहमदीनेजाद यांच्या मृत्यूचा सूड म्हणून इराणने अमेरिकेच्या ‘अब्राहम लिंकन’ (Abraham Lincoln) या युद्धनौकेवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील तणाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून, हे संकट जागतिक महायुद्धाकडे झुकते की काय, अशी भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इराणच्या जनतेमध्ये सध्या संतापाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत.

Iran-Israel युद्धाचा मोठा फटका हवाई वाहतुकीवर! मध्यपूर्वेतील १८०० हून अधिक विमाने रद्द; हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले

Web Title: After khamenei ahmadinejad also perished former president killed in israeli attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • iran
  • Iran-Israel War
  • World news

संबंधित बातम्या

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
1

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
2

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी
3

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत
4

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.