Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेत संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरू; राष्ट्रपतींच्या पक्षाला बहुमत मिळण्याची अपेक्षा

श्रीलंकेत आज संसंदीय निवडणुकीसाठी मतदानास सुरूवात झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या 225 जागांसाठी 1 कोटी 70 लाख लोक मतदान करणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 14, 2024 | 02:39 PM
श्रीलंकेत संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरू; राष्ट्रपतींच्या पक्षाला बहुमत मिळण्याची अपेक्षा

श्रीलंकेत संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरू; राष्ट्रपतींच्या पक्षाला बहुमत मिळण्याची अपेक्षा

Follow Us
Close
Follow Us:

कोलोंबो: श्रीलंकेत आज संसंदीय निवडणुकीसाठी मतदानास सुरूवात झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या 225 जागांसाठी 1 कोटी 70 लाख लोक मतदान करणार आहेत. मतदान ७ वाजता सुरू झाले असून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. संसदेत बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 113 जागांची आवश्यकता आहे. ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकांनंतर, श्रीलंकेतील राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत.

देशाच्या संविधानात बदल करण्याचा उद्देश

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, अनुरा कुमारा दिसानायके यांनी संसद विसर्जित केली. आता राष्ट्रपती दिसानायके यांच्या पक्षाला या निवडणुकीत विजय मिळण्याची शक्यता आहे असे म्हटले जात आहे. यामागचे कारण म्हणजे, त्यांनी जनतेला राष्ट्रपतीच्या अधिकारांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, देशाच्या संविधानात बदल करण्याचा उद्देश त्यांचा आहे. यासाठी त्यांना दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा- इलॉन मस्कला मोठा झटका; ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ चा ‘X’वर बहिष्कार म्हणाले…

निवडणुकीत एकूण 8,821 उमेदवार प्रतिस्पर्धी

दिसानायके यांचे पक्ष, जनता विमुक्ती पेरामुना (JVP), सध्या संसदेत फक्त तीन खासदारांसोबत आहे. निवडणुकीत एकूण 8,821 उमेदवार प्रतिस्पर्धी आहेत. या निवडणुकीत आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत मतदार 22 मतदारसंघांमधून थेट निवडणूक करून 196 सदस्य निवडतात. याशिवाय, उर्वरित 29 जागा निवडणुकीत मिळालेल्या मतांनुसार वाटल्या जातात.

निवडणुकीचे निकाल 1 ते 2 दिवसांत जाहीर होण्याची अपेक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, दिसानायके यांनी विरोधी पक्षाच्या अध्यक्षांच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे त्यांचे अधिकार कमी करण्याचे आश्वासन दिले असून ते आपल्या पक्षाला बहुमत मिळवण्यासाठी जनतेला आवाहन करत आहेत. निवडणुकीतील इतर प्रमुख प्रतिस्पर्धी  माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचा युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) आणि माजी अध्यक्ष सजिथ प्रेमदासाचा एसजेबी हे आहेत. श्रीलंकेच्या दिवाळखोरी आणि आर्थिक संकटानंतर, विक्रमसिंघे यांनी देशाची पुनर्रचना केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडणुका संपल्यानंतर निवडणुकीचे निकाल 1 ते 2 दिवसांत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 2020 मध्ये मतदानानंतर दोन दिवसांत निकाल जाहीर झाले होते. निवडणूक तज्ज्ञांच्या मते, दिसानायके यांचा पक्षाला विजय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1978 मध्ये श्रीलंकेत कार्यकारी अध्यक्षपद अस्तित्वात आले होते. त्यानंतर त्यावर टीका होत आहे. मात्र सत्ते आल्यानंतर आजपर्यंत एकाही पक्षाने आपली सत्ता नष्ट केलेली नाही.

हे देखील वाचा- व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि जो बायडेन यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये शांततेत सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन

Web Title: Shri lanka election 2024 update parliment elections nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • Election
  • world

संबंधित बातम्या

Amit Shah: महिलांना व बेरोजगारांना रोख मदत, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्ष; बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या घोषणा
1

Amit Shah: महिलांना व बेरोजगारांना रोख मदत, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्ष; बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.