फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्र्म्प यांची आज व्हाईटहाऊसमध्ये भेट झाली. यावेळी 2024 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्र्म्प यांचा विजय झाला. या विजयाबद्दल बायडेन यांनी ट्रम्प यांचे औपचारिक अभिनंदन केले. विषेश म्हणजे डोनाल्ड ट्रम्प चार वर्षानंकर पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परतले. दोन्ही नेत्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये प्रमाने भेट देभन हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत संवाद साधला. 20 जानेवारी रोजी दोन्ही नेत्यांनी शांततेत सत्ता हस्तांतरणचे आश्वासन दिले.
शांततापूर्वक सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन
या बैठकीत बायडेन यांनी ट्रम्प 20 जानेवारी रोजी शांततेत सत्ता हस्तांतरणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बायडेन यांनी म्हटले की,“तुमच्या सुविधा आणि आरामासाठी आमची टीम सर्वतोपरी प्रयत्न करेल.” यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “राजकारण कठीण आहे; हे जग नेहमीच आदर्श नसते. पण आजचा दिवस चांगला आहे.” ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ जेफ झिएंट्स आणि नव्या चीफ ऑफ स्टाफ सुझी यांचेही कौतुक केले.
गेल्या काही टर्ममध्ये ट्रम्प यांनी बायडेन यांना भेट देण्यास नकार दिला होता
ही भेट शांततापूर्ण सत्ता हस्तांतरणाची परंपरा पुढे नेत आहे. मात्र मागील टर्ममध्ये ट्रम्प यांनी बायडेन यांना अशाच पारंपारिक बैठकीत भेट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे यावेळी त्यांची भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. व्हाईट हाऊसच्या ऐतिहासिक फायरप्लेससमोर पिवळ्या खुर्च्यांवर बसलेल्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या भावना आदरपूर्वक स्वीकारल्या आणि पुढील वर्षी 20 जानेवारी रोजी सत्तेचे शांततापूर्ण हस्तांतरण करण्याची इच्छा व्यक्त केली.
#WATCH | Washington, DC, USA: President Joe Biden and President-elect Donald Trump meet at the White House after US presidential polls
(Source: US Network Pool/Reuters) pic.twitter.com/c16I3lSohB
— ANI (@ANI) November 13, 2024
अमेरिकेच्या नव्या अध्यायाची सुरूवात
या बैठकीला अमेरिकेतील राजकीय परंपरेत विशेष स्थान दिले जात आहे, कारण एका नव्या अध्यायाची सुरुवात म्हणून हे सत्ता हस्तांतरण पाहिले जाते. दोन्ही नेत्यांनी भविष्यकाळातील सहकार्याबाबत सकारात्मक संकेत दिले. यामुळे अमेरिकी राजकारणातील तणाव निवळण्याची शक्यता आहे.
ट्रम्प प्रशासन
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. आता अमेरिकेचे नवचर्चित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपल्या प्रशासनासाठी नवीन टीम बांधण्यात व्यस्त आहे. ट्रम्प यांनी आपल्या नवीन प्रशासनात इमिग्रेशन धोरणाचे उपप्रमुख म्हणून स्टीफन मिलर यांची निवड करण्यात आली आहे. तर ट्रम्प यांनी माईक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती केली आहे. दुसरीकडे टॉम होमन यांना “बॉर्डर झार” म्हणून नियुक्त केले आहे. याशिवाय ही अनेक पदाच्या नियुक्त्या त्यांनी केल्या आहेत.
हे देखील वाचा- Israel-Hamas War: इस्त्रायलचे गाझावर विनाशकारी हल्ले; 24 तासांत 46 जणांचा मृत्यू